डेबिट कार्डाद्वारे ४० हजारांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 01:24 IST2021-10-07T01:24:10+5:302021-10-07T01:24:58+5:30

टीएम केंद्रात पैसे काढणाऱ्या व्यक्तीचे डेबिट कार्ड घेऊन त्यामार्फत परस्पर ४० हजार रुपये काढून घेत भामट्याने एकास गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

40,000 by debit card | डेबिट कार्डाद्वारे ४० हजारांना गंडा

डेबिट कार्डाद्वारे ४० हजारांना गंडा

नाशिक : एटीएम केंद्रात पैसे काढणाऱ्या व्यक्तीचे डेबिट कार्ड घेऊन त्यामार्फत परस्पर ४० हजार रुपये काढून घेत भामट्याने एकास गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ललीत हिरामण जाधव (४७, रा. जत्रा हॉटेल चौक) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. ललीत हे २९ सप्टेंबरला सकाळी पैसे काढण्यासाठी केंद्रात गेले होते. त्यावेळी भामट्याने ललीत यांच्याकडील एटीएम कार्ड लबाडीने घेतले. त्यानंतर या कार्डचा वापर करून भामट्याने ४० हजार रुपये काढून गंडा घातला. याप्रकरणी आडगाव पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: 40,000 by debit card