अजंगवडेल शिवारात बिबट्याकडून ४० मेंढ्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 14:48 IST2018-08-17T14:48:16+5:302018-08-17T14:48:39+5:30
मालेगाव : तालुक्यातील अजंगवडेल शिवारात एका शेतकऱ्याच्या ४० मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सदर घटना घडली असून बिबट्यांची संख्या एकापेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अजंगवडेल शिवारात बिबट्याकडून ४० मेंढ्या फस्त
मालेगाव : तालुक्यातील अजंगवडेल शिवारात एका शेतकऱ्याच्या ४० मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सदर घटना घडली असून बिबट्यांची संख्या एकापेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येथील शेतकरी तुळशीराम दगडू काकुळते यांच्या ४० मेंढ्या अजंगवडेल शिवारात जाळीच्या वाड्यात असायच्या. गुरु वारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. सदर प्रकार दुसºया दिवशी सकाळी काकुळते यांच्या निदर्शनास आला. या घटनेचा तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी व वन विभागाच्या अधिकारयांच्या उपस्थित पंचनामा करण्यात आला आहे.