शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

शहरात ४० नाकाबंदी पॉइंट; पोलीस उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 7:08 PM

पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील याबाबत नाशिककरांना आवाहन करत लॉकडाऊन यशस्वी करण्याची साद घातली आहे

ठळक मुद्देअनावश्यक कारणासाठी घराबाहेर येऊ नका लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी

नाशिक : शहर व परिसरात बुधवारपासून लॉकडाऊन येत्या २३ तारखेपर्यंत जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याकरिता शहर पोलीस, ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले आहे. शहरात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील फिक्स पॉइंट, तात्पुरते पॉइंट मिळून सुमारे ४० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या सुत्रांनी सांगितले. नागरिकांनी केवळ वैद्यकिय कारणांसाठीच घराबाहेर पडावे, अनावश्यकरित्या घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.शहरात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सर्वानुमते बारा दिवसांचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील याबाबत नाशिककरांना आवाहन करत लॉकडाऊन यशस्वी करण्याची साद घातली आहे. दरम्यान, अंशत: लॉकडाऊन काळात नियमांच्या अंमलबजावणीत असलेली शिथिलता आता दिसणा नसून नियम आणि अंमलबजावणी कठोर करण्यात आली आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोठेही कोणत्याही कारणास्तव नागरिकांची गर्दी होणार नाहीआणि सोशल डिस्टन्स धोक्यात येणार नाही, यासाठी चोख नियोजन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी दिले आहे. शहरात ४० नाकाबंदी पाँईट्स लावण्यात आले आहे. ही संख्या मोठी असून, नाकाबंदी पाँईट्समध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील. यापूर्वी शहरात नाकाबंदी पाँईट्स होते. मात्र, येथे नागरिकांना अडविण्यात येत नव्हते. आपत्तकालीन परिस्थितीमध्ये घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी चौकशी, कारवाई करण्यात येत नव्हती. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाचा गैरफायदा घेण्यास सुरूवात झाली. बुधवारी दुपारी १२ वाजेनंतर मात्र कोणतीही सुट मिळणार नाही. नागरिकांना नियमांचे पालन करावेच लागणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.पोलीस उपआयुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस निरिक्षक, उपनिरिक्षकांवर चोख बंदोबस्त व नाकाबंदीची भीस्त पाण्डेय यांनी सोपविली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस