जिल्ह्यात दिवसभरामध्ये ३४२ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 01:12 AM2020-07-09T01:12:35+5:302020-07-09T01:13:41+5:30

नाशकात बुधवारी (दि. ८) २४४ रु ग्ण बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या एकाच दिवसात ३४२ ने वाढून ६११५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील तीन तर नाशिक शहरातील दोन बाधितांनी जीव गमावल्याने बळींची संख्या २९८ वर पोहोचली आहे.

342 corona affected in the district during the day | जिल्ह्यात दिवसभरामध्ये ३४२ कोरोना बाधित

जिल्ह्यात दिवसभरामध्ये ३४२ कोरोना बाधित

Next
ठळक मुद्देउच्चांक : रुग्णसंख्या सहा हजार पार; पाच जणांचा मृत्यू

नाशिक : नाशकात बुधवारी (दि. ८) २४४ रु ग्ण बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या एकाच दिवसात ३४२ ने वाढून ६११५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील तीन तर नाशिक शहरातील दोन बाधितांनी जीव गमावल्याने बळींची संख्या २९८ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात बुधवारी नाशिक महापालिका हद्दीत तब्बल २४४ नाशिक ग्रामीण ९० आणि मालेगाव मध्ये ८ रु ग्ण असे एकूण ३४२ रु ग्ण बाधित आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत बाधित असलेल्या एकूण रु ग्णांची संख्या ६११५ वर पोहोचली आहे. दरम्यान बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रु ग्णालयांमध्ये ८६५ नवीन संशयित दाखल झाले आहेत. त्यात नाशिक महापालिका हद्दीतील रु ग्णालयांमध्ये ५८६, नाशिक ग्रामीण रु ग्णालयांमध्ये १९९ जिल्हा रु ग्णालयात १७ तरडगाव मेडिकल कॉलेज आणि मालेगाव रु ग्णालयात प्रत्येकी ६ संशयित दाखल आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३५११ रु ग्ण कोरोना मुक्त झाले असून २६०४ पॉझिटीव्ह रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागामध्ये झालेल्या तीन मृत्यूंमध्ये एक व्यक्ती लाखलगाव , दुसरा इगतपुरी आणि तिसरा सटाणा येथील रहिवासी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येण्यामागे जिल्ह्यातील चाचण्यांचे वाढविण्यात आलेले प्रमाण असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
निफाड शहरात कोरोनाचे रु ग्ण वाढत चालल्याने गुरु वार (दि.९) पासून लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे.
ओझरला महिलेचा मृत्यू
गेल्या पंधरा दिवसांत ओझर गावात कोरोना बधितांचा आकडा १७ झाला असून बुधवारी (दि.८) सकाळी सायखेडा फाटा येथेच व्यवसाय करणाऱ्या कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. अद्याप १७ अहवाल प्रलंबित आहेत. सायखेडा फाटा येथे व्यवसाय करणाºया एका पुरु षाचा मंगळवारी मृत्यू झालेला असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे.
मनमाडला सात रुग्ण
मनमाड शहरात बुधवारी (दि.८) नव्याने ७ रु ग्ण पॉझिटीव्ह आढळून आल आहेत. शहरातील सात तर माळेगाव कर्यात येथील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मनमाड मधील रु ग्ण संख्या आता ९३ झाली असून त्यातील ५४ बरे झाले आहेत तर ३४ जणावर उपचार सुरू आहे. बुधवारी नव्याने २१ जणांचे स्वॅब घेण्यात आले.

Web Title: 342 corona affected in the district during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.