गायीच्या पोटातून काढले ३३ किलो प्लॅस्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 00:20 IST2020-06-15T00:11:56+5:302020-06-15T00:20:04+5:30

तपोवनातील वृंदावन गोशाळेत महापालिकेने दाखल केलेल्या गायींपैकी तीन ते चार गायींची प्रकृती बिघडल्याने त्याच्यापैकी एका गायीवर रविवारी (दि.१४) सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी गायीच्या पोटातून ३३ किलो प्लॅस्टिक काढण्यात आले. या प्लॅस्टिकमध्ये लोखंडाचे तुकडे तसेच घड्याळाच्या बॅटरीतील सेलदेखील आढळून आले.

33 kg plastic removed from cow's stomach | गायीच्या पोटातून काढले ३३ किलो प्लॅस्टिक

गायीच्या पोटातून काढले ३३ किलो प्लॅस्टिक

ठळक मुद्देजीवनदान : शस्त्रक्रियेत लोखंडाचे तुकडे, बारदान, बॅटरीचे सेलही आढळले

नाशिक : तपोवनातील वृंदावन गोशाळेत महापालिकेने दाखल केलेल्या गायींपैकी तीन ते चार गायींची प्रकृती बिघडल्याने त्याच्यापैकी एका गायीवर रविवारी (दि.१४) सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी गायीच्या पोटातून ३३ किलो प्लॅस्टिक काढण्यात आले. या प्लॅस्टिकमध्ये लोखंडाचे तुकडे तसेच घड्याळाच्या बॅटरीतील सेलदेखील आढळून आले.
रस्त्याने मोकाट फिरणाऱ्या पंधरा गायी महापालिकेने पकडून तपोवनातील वृंदावन गोशाळेत ठेवल्या आहेत. या गायींपैकी काही गायी या चारा खात नसल्याचे तसेच त्यांना त्रास होत असल्याचे संचालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पशुवैद्यकीय रुग्णालयाला याबाबतची माहिती दिली. डॉ. संदीप पवार यांनी गोशाळेत येऊन गायीची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर गायीच्या पोटातून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा काढण्यात आला. गायीच्या पोटातून कापडाचे तुकडे, बारदान तसेच घड्याळ, रिमोटचे सेलदेखील आढळून आले. या शस्त्रक्रियेनंतर गायीचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, उर्वरित चार गायींवर दर रविवारी एक याप्रमाणे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
राज्यात प्लॅस्टिक बंदी असतानाही नागरिक प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याने त्यात कचरा भरून फेकण्याचा प्रकार गायींचा जिवावर बेतत आहे. शिळे अन्नपदार्थ तसेच केरकचरा काढताना खेळण्यातील प्लॅस्टिकच्या तुटलेल्या वस्तूंचे अवशेष, पिना, खिळे, सेल, काचेचे तुकडे प्लॅस्टिकच्या पिशवित भरून कचºयाबरोबर टाकून देतात. याच पिशव्यांमधील पदार्थ खाण्यासाठी गायी प्लॅस्टिक पिशवी खातात यातून त्यांच्या पोटात लोखंड, कापड, लोखंडी वस्तू जातात.

Web Title: 33 kg plastic removed from cow's stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.