शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओच्या महसुलात ३३ कोटींची वाढ

By admin | Updated: April 1, 2017 02:04 IST

नाशिक : वाहन नोंदणी, आकर्षक क्रमांक तसेच विविध प्रकारच्या कराद्वारे प्रादेशिक परिवहन विभागास (आरटीओ) दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो.

नाशिक : वाहन नोंदणी, आकर्षक क्रमांक तसेच विविध प्रकारच्या कराद्वारे प्रादेशिक परिवहन विभागास (आरटीओ) दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. नोटाबंदीमुळे वाहन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना फटका बसूनही नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाचा महसूल २०१६-१७ मध्ये मिळालेला महसूल हा गतवर्षी मिळालेल्या महसुलापेक्षा १४़९० टक्के अधिक वसूल केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे़  नाशिक परिवहन विभागात मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचाही समावेश आहे़ वाहन नोंदणी, चालक परवाने, आकर्षक वाहन क्रमांक, दंड, विविध कर यातून आरटीओला महसूल मिळतो. आरटीओ कार्यालयास मिळणाऱ्या महसुलात दरवर्षी सातत्याने वाढ होत आहे़ २०१५-१६ या आर्थिक वर्षात नाशिक कार्यालयास एकूण २१२ कोटी ७९ लाख ४ हजार रुपयांचा महसूल मिळाला होता़ यामध्ये १४़९० टक्क्यांची वाढ होऊन २०१६-१७ या आर्थिक वर्षात २४४ कोटी ५० लाख ५० हजार रुपयांचा महसूल मिळाला असून गतवर्षीपेक्षा यावेळी ३३ कोटींची महसुलात भर पडली आहे़  आरटीओ कार्यालयात गतवर्षी १ लाख ९ हजार ८०२ वाहनांची नोंदणी करण्यात आली होती, तर यावर्षी १ लाख १ हजार ४३७ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून, त्यामध्ये ७़६२ टक्क्यांची घट झाली आहे़ आरटीओ भरारी पथकांच्या यावर्षीच्या कामगिरीमुळे होणाऱ्या महसुलात तूट आली आहे़ तर आकर्षक क्रमांकांनी महसुलात चांगलाच हातभार लावला असून, गतवर्षीच्या तुलनेत २३़७४ टक्क्यांनी महसुलात वाढ झाली आहे़ दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बीएसथ्री वाहन विक्रीवर ३१ मार्चनंतर घातलेल्या बंदीमुळे नागरिकांनी पूर्वीच ही वाहने खरेदी केल्यामुळेही महसुलात चांगलीच भर पडली  आहे़ (प्रतिनिधी)