आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी ३२ मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:22 IST2017-12-26T23:28:16+5:302017-12-27T00:22:11+5:30

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण मंडळ निवडणूक दि. २८ रोजी होणार असून, याकरिता राज्यातील विविध ३२ ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विद्यापीठातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.

32 polling stations for the University of Health Sciences elections | आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी ३२ मतदान केंद्रे

आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी ३२ मतदान केंद्रे

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण मंडळ निवडणूक दि. २८ रोजी होणार असून, याकरिता राज्यातील विविध ३२ ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विद्यापीठातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.  या मतदानासाठी राज्यात मुंबई भायखळा येथील ग्रॅट मेडिकल कॉलेज, जे. जे. हॉस्पिटल कम्पाउंड, सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज, के.ई.एम. हॉस्पिटल कम्पाउंड, सेंट्रल मुंबई येथील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, वरळी येथे आर. ए. पोतदार आयुर्वेद महाविद्यालय, सायन येथे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे एस.ए.एस.एस. योगीता डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल, खारघर नवी मुंबई येथे येरला मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक महाविद्यालय, पुणे येथील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, बी. जे. मेडिकल कॉलेज, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आकुर्डी येथील पी.डी.ई.एस. कॉलेज आॅफ आयुर्वेद अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, सांगली जिल्ह्यात मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातार येथील एस. सी. मुथा आर्यांग्ल आयुर्वेद महाविद्यालय, कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे डॉ. वैशंपायन मेमोरिअल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेद महाविद्यालय, धुळे येथे भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे चामुंडामाता होमिओपॅथिक कॉलेज, अहमदनगर येथे गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, संगमनेर येथे श्रीमती मथुराबाई भाऊसाहेब थोरात दंत महाविद्यालय, औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बीड जिल्ह्यात आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज, वर्धा येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेज, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि एन.के.पी. साळवे मेडिकल कॉलेज, अमरावती येथील विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, यवतमाळ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे शासकीय महाविद्यालय या ठिकाणी मतदान केंदे्र निश्चित करण्यात आली आहेत.

Web Title: 32 polling stations for the University of Health Sciences elections

टॅग्स :Nashikनाशिक