४५८ अजामीनपात्र वॉरंट बजावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:01 IST2019-10-17T22:58:53+5:302019-10-18T01:01:49+5:30
नाशिक शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयास्पद उपद्रवी लोकांची तपासणी करीत सुमारे ४५८ अजामीनपात्र वॉरंट अद्यापपर्यंत बजावले आहेत. ११८ अजामीनपात्र वारंट प्रलंबित असून, त्याचीही लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले.

४५८ अजामीनपात्र वॉरंट बजावले
नाशिक : शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयास्पद उपद्रवी लोकांची तपासणी करीत सुमारे ४५८ अजामीनपात्र वॉरंट अद्यापपर्यंत बजावले आहेत. ११८ अजामीनपात्र वारंट प्रलंबित असून, त्याचीही लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले. निवडणूक काळात कुठल्याही प्रकारे शांतता धोक्यात येणार नाही आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. या अंतर्गत पोलिसांनी शहरात नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन, आॅल आउट आॅपरेशन, हॉटेल्स, लॉजेस, ढाब्यांची नियमित तपासणी करण्यावर भर दिला आहे. याद्वारे सराईत गुन्हेगारांचीही तपासणी केली जात आहे.
ज्या गुंडांना तडीपार करण्यात आले आहे, ते गुंड शहरात पुन्हा वावरणार नाही, याची दक्षताही घेतली जात आहे.
शांतता भंग करून उपद्रव निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ४५८ लोकांना पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. एकूण ५७६ लोकांची यादी पोलिसांनी तयार केली असून, उर्वरित ११८ वॉरंटही या तीन दिवसांत बजावले जाणार आहे.