सिन्नरमधील ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:17 PM2020-02-01T23:17:53+5:302020-02-02T00:11:52+5:30

देवनदीवरील कुंदेवाडी ते सायाळे या ३४ किमी लांबीच्या बंदिस्त पूरचारीचे काम प्रगतिपथावर आहे. सुमारे १० किलोमीटर हद्दीतील काम वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होण्याची चिन्हे असून, दुष्काळी पूर्व भागाला नवसंजीवनी मिळणार आहे.

3 hectares in Sinnar | सिन्नरमधील ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

सिन्नरमधील ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

Next
ठळक मुद्दे७१ कोटींचा प्रकल्प । तालुक्याच्या दुष्काळी पूर्वभागाला मिळणार नवसंजीवनी

सिन्नर : देवनदीवरील कुंदेवाडी ते सायाळे या ३४ किमी लांबीच्या बंदिस्त पूरचारीचे काम प्रगतिपथावर आहे. सुमारे १० किलोमीटर हद्दीतील काम वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होण्याची चिन्हे असून, दुष्काळी पूर्व भागाला नवसंजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पातून पूर्व भागासाठी १०५ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी सुमारे ७१.०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या प्रकल्पामुळे सुमारे ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
पूर्व भागासाठी संजीवनी ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या कामाने आता वेग घेतला आहे. तथापि, गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने कालवा मार्गातील बहुतांश शेतीमध्ये खरीप, रब्बीची पिके उभी आहेत. त्यांचे नुकसान होऊ न देता कामाला गती देण्याचा प्रयत्न लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदार एजन्सीने केला असल्याचे दिसून येते.
देवनदीवरील सिन्नर-कुंदेवाडीच्या दरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन बलक बंधाºयाच्या जागी नवा सीमेंट बंधारा बांधून तेथूनच सायाळेसह २० गावांपर्यंत १६०० मिमी व्यासाच्या सीमेंट पाइपमधून पाणी नेण्यात येणार आहे. या ब्रिटिशकालीन बंधाºयातून ब्रिटिशकाळापासून अस्तिवात असणाºया दोनही पाटचाऱ्यांच्या पाण्याला कुठेही धक्का न लावता ही नवी योजना अमलात येत आहे. या योजनेसाठी देवनदीचे १०५ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असून, देवनदीचे पूरपाणी वडांगळीला पोहोचल्यानंतरच या बंदिस्त पाइपलाइनमध्ये सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या बंधाºयात देवनदीबरोबरच शिवनदीचेही पाणी येते. दोन्ही ब्रिटिशकालीन पाट कालवा व्यवस्थेपैकी एक देवनदीच्या पाण्यातून तर दुसरी शिवनदीच्या पाण्यावर
चालते. धरणाजवळ या दोन्ही कालव्यांचे पाणी धरणापासून काही अंतरापर्यंत बंद पाइपने नेऊन कालव्यांमध्ये सोडण्यात आले आहे. नव्या बंधाºयाचे काम पूर्ण होत आले आहे.

असून, नदीच्या दोनही बाजूंनी सीमेंटच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत.
शेती नसलेल्या मोकळ्या भागात पाइपलाइन टाकण्याचे दहा किमी लांबीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू असून, गोंदे फाट्याजवळ समृद्धी महामार्ग तोडून पाइपलाइन टाकण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. बंद पाइपलाइनमध्ये २० जागांवर चेंबर्स टाकण्यात येणार असून, पाइपलाइनमध्ये काही अडथळे आल्यास तेथून दुरु स्ती करणे शक्य होणार आहे. बंद पाइपलाइनद्वारे २० गावांमधील नाल्यांमध्ये पूरपाणी सोडण्यात येणार असून, या गावांच्या परिसरातील ४० हून अधिक पाझर तलाव, बंधारे या पूरपाण्याने भरून घेण्यात येणार आहेत. त्याशिवाय दातली, माळवाडी व दुशिंगपूरची एम.आय. टँक भरून घेणे शक्य होणार आहे. यामुळे परिसरातील मोठे क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. या योजनेच्या एकूण ३४ किमीपैकी १८ किमीपर्यंत १६०० किमी व्यासाचे, नंतरचे ७ किमी १२०० मिमी व्यासाचे व पुढे १००० मिमी व्यासाचे सीमेंट पाइप टाकण्यात येणार आहेत. बंधाºयापासून ८० क्युसेस पाणी सोडण्यात येणार असून, शेवटच्या टोकाला अवघ्या आठ तासांत पाणी पोहोचणार आहे. गोंदनाला, हाबेवाडी (मुसळगाव), फत्तेपूर, दोडी येथील नाल्यांवर लोखंडी जलसेतून बांधून पाइपलाइन वरून नेण्यात येणार आहे. गेल्या साडेपाच वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून तालुक्याच्या पूर्व भागातील गावांचा दुष्काळ दूर करण्यासाठी देवनदीला येणाºया पूरपाण्यातून पूर्व भागातील २० गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी पूरचाºयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यानंतर सत्ताबदलानंतर या कामाला पुन्हा ब्रेक लागला होता. त्यानंतर तत्कालीन आमदार राजाभाऊ वाजे यांनीही पुढाकार घेत सदर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. दोन्ही आजी-माजी आमदारांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने आज या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.
कुंदेवाडी व सिन्नर शिवारात असलेल्या बलक तथा मापारपाट बंधाºयाच्या जागेवर नव्याने वळण बंधारा बांधण्यात आला असून, येथून कुंदेवाडी, गुरेवाडी, धोंडवीरनगर, हाबेवाडी, मुसळगाव, गोंदे, दातली, खंबाळे, भोकणी, मºहळ खुर्द व बुद्रुक, सुरेगाव, दोडी खुर्द, दोडी बुद्रुक, कणकोरी, मानोरी, फत्तेपूर, निºहाळे, फुलेनगर, घोटेवाडी, कहांडळवाडी, मलढोण व सायाळे या गावांच्या शिवारातून हा बंदिस्त पाइपलाइनद्वारे पूरकालवा साकारण्यात येत आहे. प्रत्येक गावातील बंधारे भरण्यात येणार असल्याने पूर्र्व भागातील पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. या कालव्यासाठी एकूण १४ हजार सीमेंट पाइप लागणार असून, जवळपास ३५०० पाइप तयार आहेत.

Web Title: 3 hectares in Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.