शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

२७ तारखेला दोन चंद्र दिसण्याची निव्वळ अफवा

By admin | Updated: August 19, 2014 01:21 IST

सोशल मीडिया : व्हॉट्स अप, फेसबुकवर पीक; विज्ञानविसंगत घटनांच्या प्रचाराद्वारे होतेय दिशाभूल

नाशिक : एका अनोख्या क्षणाचे साक्षीदार व्हा... अवघे जग त्या क्षणाची आतुरतेने वाट पहात असून, येत्या २७ तारखेला अवकाशात दोन चंद्र दिसणार आहेत, अन् असा योग पुन्हा २२८७ मध्ये पहावयास मिळणार असल्याने ही संधी चुकवू नका, असा संदेश सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून फिरत असून, तो अनेकांच्या भ्रमणध्वनीवरही येऊन आदळला असेल. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही होणार नसून केवळ अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनच खगोलतज्ज्ञांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, विशेषत: फेसबुक व व्हॉट्स अपवर येत्या २७ तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास अवकाशात दोन चंद्र दिसणार आहेत. असा योग पुन्हा २२८७ मध्ये जुळून येणार आहे, अशा आशयाचे छायाचित्र व मजकूर फिरतो आहे. यामध्ये, मंगळ ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येणार असल्याने तो चंद्रासारखा अवकाशात साऱ्यांना पहाता येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे २७ आॅगस्टच्या मध्यरात्री १२.३०च्या सुमारास चंद्र व मंगळ दोन्ही अवकाशात सहज पाहता येणार असल्याचे म्हटले आहे. वास्तविक, असे काहीही होणार नसल्याचे खगोलतज्ज्ञांनी म्हटले आहे. मंगळ ग्रह हा पृथ्वीपासून अनेक कोटी किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे तो पृथ्वीच्या इतक्या जवळ तर नक्कीच येऊ शकत नाही की तो सहज नजरेने वा चंद्रासारखा दिसेल. चंद्र दिसतो कारण तो काही लाख अंतरावर आहे. तसेच तो पृथ्वीचा उपग्रह आहे, त्यामुळे तो दिसतो, असेही खगोलतज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या २७ तारखेला अवकाशात दोन चंद्र दिसतील ही केवळ अफवा असून, त्यास कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्यामुळे त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनच खगोलतज्ज्ञांनी केले आहे.(प्रतिनिधी)