ट्रकमध्ये कोंबलेल्या २७ म्हशींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 10:56 PM2022-05-16T22:56:35+5:302022-05-16T22:57:03+5:30

सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावर हॉटेल मुंबई ढाब्याजवळ सोमवारी (दि.१६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयशर ट्रकमधून निर्दयपणे कोंबून घेऊन जाणाऱ्या २७ म्हशींची एमआयडीसी पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी ट्रकचालक समीर अहमद खान (वय ३७) रा. धारावी, मुंबई यास ताब्यात घेतले आहे.

27 buffaloes rescued from truck | ट्रकमध्ये कोंबलेल्या २७ म्हशींची सुटका

ट्रकमध्ये कोंबलेल्या २७ म्हशींची सुटका

Next
ठळक मुद्देसिन्नर : एमआयडीसी पोलिसांकडून कारवाई

सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावर हॉटेल मुंबई ढाब्याजवळ सोमवारी (दि.१६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयशर ट्रकमधून निर्दयपणे कोंबून घेऊन जाणाऱ्या २७ म्हशींची एमआयडीसी पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी ट्रकचालक समीर अहमद खान (वय ३७) रा. धारावी, मुंबई यास ताब्यात घेतले आहे.

सिन्नर-शिर्डी मार्गावरून आयशर ट्रकमधून ( क्रमांक एमच ०४ जेयू ३५१३) बेकायदेशीरपणे व निर्दयतेने काही म्हशींची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी हॉटेल मुंबई ढाब्याजवळ हा ट्रक अडवून पाहणी केली असता, ट्रकमध्ये २७ लहान-मोठ्या म्हशी आढळून आल्या. ट्रकचालक समीर अहमद खान याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून ४ लाख रुपये किमतीचा आयशर ट्रकदेखील जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, म्हशींची सुटका केल्यानंतर माळेगाव शिवारात जिंदाल फाट्यासमोरील संजय चोथवे यांच्या हरिओम गोशाळेत म्हशींना सोडण्यात आले. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन कळकळ, विनोद इप्पर, स्वप्नील पवार तपास करीत आहेत.

गोंदेश्वरमागे आढळले १६ बैल
पुरातन गोंदेश्वर मंदिराच्या मागे सोमवारी (दि.१६) दुपारी जवळपास सोळा बैल बांधलेले आढळून आले. नागरिकांनी याबाबत सिन्नर पोलिसांना माहिती दिली. अज्ञात व्यक्तीने हे बैल येथे बांधून पोबारा केल्याचे समोर आले. मात्र, त्याचा उद्देश अद्याप समजलेला नाही. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बैलांना देखील हरिओम गोशाळेत सोडण्यात आले.

Web Title: 27 buffaloes rescued from truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.