सिटीलींकच्या अडीचशे बसेस बंद, नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल

By संजय पाठक | Updated: April 13, 2023 10:53 IST2023-04-13T10:53:16+5:302023-04-13T10:53:33+5:30

कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याच्या कारणावरून संप

2500 buses of Citylink closed due to strike and passengers in Nashik suffers in Summer heat | सिटीलींकच्या अडीचशे बसेस बंद, नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल

सिटीलींकच्या अडीचशे बसेस बंद, नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल

संजय पाठक, नाशिक: महापालिकेच्या सिटी लिंक कंपनी मार्फत चालवण्यात येणाऱ्या सुमारे अडीचशे बस आज सकाळपासून बंद करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याच्या कारणावरून हा संप पुकारण्यात आला असून त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांनी संपाची नोटीस सिटीलींक प्रशासनाला दिली होती त्यानुसार 24 एप्रिल पासून संप करण्याचे नियोजन होते मात्र तत्पूर्वीच अचानक काम बंद केल्यामुळे प्रवाशांच्या हाल झाले असे सिटी लिंकचे उपमहाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांना महिनाभरापासून वेतन मिळालेले नाही तसेच अन्य अनेक मागण्या आहेत त्यामुळे त्यांनी हा बंद पुकारला आहे मात्र कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना दिलेली नसल्याने हा संप बेकायदेशीर असल्याचे सिटी लिंकचे मिलिंद बंड यांनी सांगितले.

Web Title: 2500 buses of Citylink closed due to strike and passengers in Nashik suffers in Summer heat