शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

सिंहस्थ संपल्यावर अडीच कोटींचा निधी

By admin | Updated: October 21, 2015 23:19 IST

शासनाचे वराती मागून घोडे : आरोग्य विभागाचे कानावर हात

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा संपून महिना उलटल्यानंतर शासनाला भाविकांच्या आरोग्याची काळजी वाटली असून, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेला औषध खरेदीसाठी २ कोटी ४९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे औषध खरेदीसाठी यापूर्वीच आलेला सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने शासनाला परत केलेला आहे.१९ आॅक्टोबर रोजी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत आरोग्य विभागामार्फत भाविकांना द्यावयाच्या आरोग्य सुविधांसाठी औषधे, लिनन व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी २ कोटी ४९ लाख ९९ हजारांचा निधी वितरित करण्यात येत असल्याचे पत्र विभागाचे अवरसचिव प्रकाश इंदलकर यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार २२१० व ५०४१ लेखाशीर्षाखाली सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात ही औषधे खरेदी करण्यासाठी हा सुमारे अडीच कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून औषधे खरेदी करताना विहित कार्यपध्दतीचा अवलंब करावा, तसेच शासनाने नियुक्त केलेल्या खरेदी समितीने आखून दिलेल्या विहित पद्धतीनुसार खरेदी केली जावी, अर्थ व प्रशासन सहसंचालकांनी अटींची पूर्तता झाल्याची खात्री करून हे अनुदान अदा करावे, असे पत्रात म्हटले आहे. मुळातच सिंहस्थ काळात तातडीची उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शासनाने निधीची मागणी केल्याचे समजते. त्यावेळी आॅगस्टमध्ये सुमारे १ कोटी ८० लाखांचा निधी जिल्हा परिषदेला पाठविला होता. मात्र या निधीतून शासन नियमांच्या अधीन राहून खरेदी व खर्च करता येणे अशक्य असल्याचे पाहत हा निधी आरोग्य संचालकांकडे परत केल्याचे समजते. तसेच राज्यस्तरा वरूनच सिंहस्थासाठी तातडीची औषधे व साहित्य उपलब्ध करून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता सिंहस्थ संपल्यानंतर महिनाभराने नेमका हा अडीच कोटींचा निधी शासनाने का पाठविला? याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चा आहे. (प्रतिनिधी)