ओझर येथे आज आढळले 25 कोरोनाबाधित रुग्ण.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:43 IST2021-05-11T22:19:08+5:302021-05-12T00:43:06+5:30

ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात कोरोना बाधितांची संख्या गेल्या बारा दिवसापासून कमी येते आहे ओझरकरांना थोडा फार दिलासा मिळत असतांनाच आज पुन्हा संख्या वाढली असुन 25 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत त्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

25 coronary artery disease found today at Ozark. | ओझर येथे आज आढळले 25 कोरोनाबाधित रुग्ण.

ओझर येथे आज आढळले 25 कोरोनाबाधित रुग्ण.

ठळक मुद्देओझरसह परिसरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण 4404 झाली आहे

ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात कोरोना बाधितांची संख्या गेल्या बारा दिवसापासून कमी येते आहे ओझरकरांना थोडा फार दिलासा मिळत असतांनाच आज पुन्हा संख्या वाढली असुन 25 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत त्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
ओझरटाऊनशिप सह ओझर परिसरातील. 25 रुग्णाचा अहवाल आज कोरोना बाधित आला आहे त्यामुळे आता ओझरसह परिसरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण 4404 झाली आहे पैकी 131 कोरोना बाधितांचा म्रुत्यू झाला 4037 रुग्ण बरे झाले असुन 236 रुग्णावर उपचार सुरू आहे पैकी 17 रुग्णावर रूग्णालयात उपचार सुरू असुन 219 रुग्ण घरीच काँरंटाईन होऊन उपचार घेत आहेत परिसरातील एकुण कंटेन्मेंट झोन संख्या 2150 झाली असुन 1933 झोन पूर्ण झाले आहेत आता अँक्टिव्ह झोन 217 आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे
ओझर परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने रँपीड टेस्ट सुरू आहे या टेस्टमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या घरातील व्यक्ती सह संपर्कात आलेल्या नागरिकांनी तपासणी करून घ्यावी तसेच नागरिकांनी या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी, होम क्वारंटाईन रुग्णांनी घरातच थांबावे बाहेर फिरू नये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओझर सह परिसरातील नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्री नियमांचे पालन करावे सर्वानी मास्क,सँनिटाईझर , सोशल डिस्टशनिंगचा नियमित वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे आरोग्य अधिकारी डाँ.वैशाली कदम , आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.

Web Title: 25 coronary artery disease found today at Ozark.