पंढरपूरास गेलेले जानोरीचे २४ सायकलिस्ट पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 08:35 PM2020-12-24T20:35:25+5:302020-12-25T00:54:28+5:30

दिंडोरी : पंढरपूर येथे सायकल यात्रेस गेलेल्या जानोरी येथील २४ सायकलिस्ट यांना कोरोनाची बाधा झाल्याने जानोरी येथे झपाट्याने संसर्ग ...

24 cyclists of Janori who went to Pandharpur are positive | पंढरपूरास गेलेले जानोरीचे २४ सायकलिस्ट पॉझिटिव्ह

पंढरपूरास गेलेले जानोरीचे २४ सायकलिस्ट पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देआठवडे बाजार बंद : गाव केले लॉकडाऊन

दिंडोरी : पंढरपूर येथे सायकल यात्रेस गेलेल्या जानोरी येथील २४ सायकलिस्ट यांना कोरोनाची बाधा झाल्याने जानोरी येथे झपाट्याने संसर्ग वाढत दोन दिवसात ४१ कोरोना रुग्ण झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे वृत्त असे की जानोरी येथील २४ नागरिक सायकल रॅली निमित्त पंढरपूर येथे गेले होते, तिथून आल्यानंतर हे सर्व इसम कोरोना संसर्गित झाल्याने गावात अनेक व्यक्ती बाधित झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने जानोरी गाव दोन दिवस लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. गावात दर शुक्रवारी होणारा आठवडे बाजार देखील रद्द करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी काळजी घ्यावी अनावश्यक गावाबाहेर जाऊ नये, मास्क नियमीत वापरावे, शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोरोना बाधित व्यक्तींना खासगी दवाखान्यात व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी दूरचा प्रवास टाळला पाहिजे, सर्व पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोव्हीड टेस्ट करून घ्यावी, सुरक्षित अंतर व मास्कचा वापर करावा.
- डॉ. सुजित कोशिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी.

Web Title: 24 cyclists of Janori who went to Pandharpur are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.