राजीव गांधी योजनेचा २३२ रुग्णांनी घेतला लाभ

By Admin | Updated: August 22, 2015 23:53 IST2015-08-22T23:51:38+5:302015-08-22T23:53:05+5:30

जिल्हा रुग्णालय : शासनाकडून संबंधित कंपनीस ३६ लाख रुपयांचे देयक

232 patients of Rajiv Gandhi Yojana benefit | राजीव गांधी योजनेचा २३२ रुग्णांनी घेतला लाभ

राजीव गांधी योजनेचा २३२ रुग्णांनी घेतला लाभ

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात गत २० महिन्यांच्या कालावधीत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून २९६ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, या उपचारापोटी ३० लाख २७ हजार ६७७ रुपये संबंधित कंपनीस अदा केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी दिली़
सरकारच्या राजीव गांधी आरोग्यदायी योजनेद्वारे तब्बल ९७२ आजारांवर उपचार केले जातात़ विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ रेशन कार्डामध्ये नाव असणे गरजेचे असते़ गंभीर आजारावर दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार, तर किडनीचा आजार असेल तर अडीच लाख रुपयांपर्यंतचा उपचार या योजनेद्वारे मोफत केला जातो़ जिल्ह्यातील ३० रुग्णालयांमध्ये या योजनेद्वारे उपचार केले जात असून जिल्हा रुग्णालयातही उपचार केले जातात़
या योजनेचा केशरी, अंत्योदय, पिवळे तसेच अन्नपूर्णा कार्ड असलेल्या कुटुंबाला लाभ घेता येतो़ जिल्हा रुग्णालयात गत वीस महिन्यांच्या कालावधीत या योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून, यासाठी रेशनकार्डवर नाव असणे गरजेचे आहे़ या योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनी आपल्यासोबत रेशनकार्ड घेऊन येणे गरजेचे आहे़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घेतला जात असल्याचेही डॉ़ एकनाथ माले म्हणाले़ (प्रतिनिधी)

Web Title: 232 patients of Rajiv Gandhi Yojana benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.