२३ वर्षीय तरुणाचा विहीरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 01:28 IST2021-03-01T01:27:24+5:302021-03-01T01:28:51+5:30

चांदवड  :  तालुक्यातील वाद येथील निवृत्ती म्हसु आहेर यांच्या शेतातील विहिरीजवळ प्रभू कुमार गणेश प्रजापत अचानक चक्कर येऊन पडल्याने गंभीर मार लागला. त्यास  उपचारासाठी  चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  तपासून  मृत घोषित केले.

23-year-old dies after falling into well | २३ वर्षीय तरुणाचा विहीरीत पडून मृत्यू

२३ वर्षीय तरुणाचा विहीरीत पडून मृत्यू

चांदवड  :  तालुक्यातील वाद येथील निवृत्ती म्हसु आहेर यांच्या शेतातील विहिरीजवळ प्रभू कुमार गणेश प्रजापत राहणार नाथुबा खेडा पोष्ट पटणी, ता. आशिद, जिल्हा भिलवडा हा विहीरीचे काम करण्यासाठी चांदवड तालुक्यातील वाद आला होता. त्याला अचानक चक्कर येऊन पडल्याने  त्याच्या डोक्यास, पायास गंभीर मार लागला. त्यास  उपचारासाठी  चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  तपासून  मृत घोषित केले.  
याबाबत रामकरण भैरूलाल गुजर (३५) धंदा विहिरी खोदकाम मूळ राहणार राजस्थान, हल्ली मुक्काम वाद, तालुका चांदवड याने चांदवड पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: 23-year-old dies after falling into well