मोबाइल चोरट्यांच्या टोळीकडून २३ मोबाइल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:26 IST2018-11-11T00:25:58+5:302018-11-11T00:26:16+5:30

फुलबाजार तसेच शहरातील विविध ठिकाणी नागरिकांच्या हातातील मोबाइल हिसकावणाऱ्या टोळीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ संजय कुमावत (२१, रा. श्रमिकनगर, सातपूर), समीर संतोष जोशी (२४, रा. कामठवाडे, नवीन नाशिक), विशाल पोपट सांगळे (२७, रा. अशोकनगर, सातपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून पावणेचार लाख रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे २३ मोबाइल जप्त करण्यात आले आहे़

 23 mobile seized from mobile gangs gang | मोबाइल चोरट्यांच्या टोळीकडून २३ मोबाइल जप्त

मोबाइल चोरट्यांच्या टोळीकडून २३ मोबाइल जप्त

नाशिक : फुलबाजार तसेच शहरातील विविध ठिकाणी नागरिकांच्या हातातील मोबाइल हिसकावणाऱ्या टोळीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ संजय कुमावत (२१, रा. श्रमिकनगर, सातपूर), समीर संतोष जोशी (२४, रा. कामठवाडे, नवीन नाशिक), विशाल पोपट सांगळे (२७, रा. अशोकनगर, सातपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून पावणेचार लाख रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे २३ मोबाइल जप्त करण्यात आले आहे़  नागरिकांच्या हातातील मोबाइल हिसकावणाºया टोळीतील एक जण सातपूरच्या अशोकनगर बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी विशाल काठे, स्वप्निल जुंद्रे यांना मिळाली होती. यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ, महेश कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, बलराम पालकर, पोपट कारवाळ, शांताराम महाले, विशाल काठे, विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे यांच्या पथकाने रविवारी अशोकनगर बसस्थानक परिसरात सापळा लावून संशयित संजय कुमावत याला ताब्यात घेतले.  कुमावत याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार समीर जोशीबाबत माहिती दिल्यांनतर अंबड लिंकरोड परिसरात सापळा लावून जोशी यास ताब्यात घेण्यात आले़ या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीचे मोबाइल विक्रीसाठी अशोकनगर येथील विशाल सांगळेकडे दिल्याची माहिती दिली. पथकाने तत्काळ सांगळे यास अटक करून विविध कंपन्यांचे २३ मोबाइल, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा सुमारे ३ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title:  23 mobile seized from mobile gangs gang