Nashik Kidnapping: म्हसरूळ परिसरातील रहिवासी असलेल्या एका महिलेशी अनैतिक असल्याच्या संशयावरून संबंध वज्रेश्वरी झोपडपट्टीतील रहिवासी श्रीकांत भीमराव उबाळे (२२) या युवकाचे चौघांनी रिक्षातून अपहरण केले होते. त्याला पेठजवळच्या करंजाळीच्या सावळघाटात घेऊन जात बेदम मारहाण करत गळा आवळून घातपात केल्याची दाट शक्यता पंचवटी पोलिस सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. श्रीकांतचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही.
मूळ परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेला श्रीकांत हा गंगाघाट परिसरातील गायकवाड नामक व्यक्तीकडे केटरिंगचे काम करतो. गेल्या आठवड्यात श्रीकांत हा अचानकपणे बेपत्ता झाला होता. याबाबतची तक्रार त्याच्या वडिलांनी म्हसरूळ पोलिसांत दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत दिला.
तपासाला वेगपंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथून रवाना होत संशयित दीपक काकडे (२६), सविता काकडे (४५, दोघे रा. कलानगर) चंद्रकांत नारायण कुलकर्णी (रिक्षाचालक) आणि राहुल शेळके (रा. गौरी पटांगण गंगाघाट), यांना सोमवारी (दि. १७) पहाटे ताब्यात घेत म्हसरूळ पोलिसांच्या हवाली केले.
दरम्यान, म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा असल्याने पोलिसांनी सर्वांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.