निफाड तालुक्यात २१ कोरोनाबाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:31 IST2021-03-11T20:45:29+5:302021-03-12T00:31:19+5:30

निफाड : तालुक्यात गुरुवारी (दि.११) कोरोनाबाधित एकूण २१ रुग्ण आढळले असून सध्या एकूण ११८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका कोव्हिड-१९ संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.

21 corona affected patients in Niphad taluka | निफाड तालुक्यात २१ कोरोनाबाधित रुग्ण

निफाड तालुक्यात २१ कोरोनाबाधित रुग्ण

ठळक मुद्देनिफाड तालुक्याचा मृत्युदर हा सव्वा दोन वरून साडेतीन टक्के

निफाड : तालुक्यात गुरुवारी (दि.११) कोरोनाबाधित एकूण २१ रुग्ण आढळले असून सध्या एकूण ११८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका कोव्हिड-१९ संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.

दरम्यान या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने मास्क, सोशल डिस्टन्स व इतर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावी अशी मागणी करण्यात आली आहे.

गुरुवारी जे कोरोनाचे २१ रुग्ण आढळले. सदर रुग्णांची संख्या गावनिहाय पूढीलप्रमाणे पिंपळगाव बसवंत १०, आहेरगाव ४, वनसगाव १,पिंपळस रामाचे १,लासलगाव ४, ओझर १.
        तालुक्यातील जे ११८ कोरोनाबाधित रुग्ण पिंपळगांव बसवंत कोव्हिड सेंटर, खाजगी हॉस्पिटल, दवाखाने, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी उपचार घेत आहेत. तर ४५ ते ४६ रुग्ण घरी विलगीकरण होऊन उपचार घेत आहेत. दरम्यान जर सर्दी, ताप खोकला अशी फ्लू सदृश्य लक्षणे असतील तर लवकरच नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी तसेच त्यांनी संदर्भित केले असल्यास कोव्हीडची चाचणी करून घ्यावी व त्वरीत उपचार घ्यावे, असे सांगत मागील तीन महिन्यात निफाड तालुक्याचा मृत्युदर हा सव्वा दोन वरून साडेतीन टक्के इतका वाढलेला आहे असल्याचे डॉ काळे म्हणाले.

Web Title: 21 corona affected patients in Niphad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.