दिंडोरीत गट-गणांसाठी २०३ अर्ज
By Admin | Updated: February 7, 2017 01:33 IST2017-02-07T01:32:49+5:302017-02-07T01:33:01+5:30
अखेरच्या दिवशी गर्दी : शिवसेनेत बंडखोरी; इच्छुकांनी धरली भाजपाची वाट

दिंडोरीत गट-गणांसाठी २०३ अर्ज
दिंडोरी : जिल्हा परिषदेच्या सहा तर पंचायत समतिीच्या बारा जागांसाठी दिंडोरी तालुक्यातील अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत जिप गटासाठी 73 तर पंचायत समतिी गणांसाठी 130 असे एकूण 203 उमेदवारांनी अर्ज केले असून आज अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी 105 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दरम्यान शिवसेनेतील काही इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्याचे समजताच बंडखोरी करत भाजपची वाट धरली आहे दरम्यान भाजपला तालुकाध्यक्ष यांच्याच खेडगाव गटात उमेदवार देता आला नाही तर कॉंग्रेसने उमेदवार असतानाही एबी फॉर्म दिलेले नसून खेडगाव गटात शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती भास्कर भगरे यांच्यात सरळ लढत होण्याची चिन्हे आहे . शिवसेनेने तालुकाप्रमुख उत्तम जाधव , बाजार समतिी संचालक नाना मोरे यांना उमेदवारी दिलेली नसून मोरे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे .शिवसेना व राष्ट्रवादी मध्ये उमेदवारीसाठी जोरदार चुरस अखेरपर्यंत होती दोनच्या सुमारात सर्वच पक्षांनी एबी फॉर्म जमा केले .यानंतर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या इच्छुकांनी संताप व्यक्त करत काढता पाय घेतला . मडकीजाम गणात राष्ट्रवादीतून कॉंग्रेसमध्ये गेलेले नरेंद्र पेलमहाले यांनी शिवसेनेत जात उमेदवारी मिळविल्याने येथील शिवसेनेचे इच्छुक नाराज झाले .खेडगाव गटातून राष्ट्रवादीने भास्कर भगरे यांना जिप गटातून संधी देत माजी समाजकल्याण सभापती वसंत वाघ यांना पंचायत समतिी लढविण्याचे सांगितले मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता थांबण्याची भूमिका घेतली या गटात भाजपला उमेदवार मिळाला नाही तर कॉंग्रेसने येथे अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिला नाही त्यामुळे आता हे दोन पक्ष काय भूमिका घेणार यावर येथील लढत रंगतदार होणार आहे .अिहवंतवाडी गणात शिवसेनेने विद्यमान तालुकाप्रमुख उत्तम जाधव यांची उमेदवारी कापत राष्ट्रवादीतून आलेल्या संजय उमरे यांना उमेदवारी दिली तर कोचरगाव गणात बाजार समतिीचे संचालक रघुनाथ मोरे तसेच गटाचे इच्छुक सुरेश लीलके यांना उमेदवारी न दिल्याने दोघांनीही भाजप ची उमेदवारी केली . मोहाडी गटातून शिवसेनेचे भारती तुकाराम जोंधळे यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळताच रविवारीच शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अखेर भाजप ची उमेदवारी घेतली .तर उमराळे गणातून शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेल्या कविता जाधव यांनी भाजप चे तिकीट घेतले .शिवसेनेला काही ठिकाणी भाजप मध्ये गेलेल्या बंडखोरी चा सामना तर उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना व राष्ट्रवादी ला नाराज झालेल्या इच्छुकांची मनधरणी करावी लागणार आहे .दरम्यान माकपने काही जागांवर उमेदवार दिले असून उमराळे गटात मनसे व संभाजी ब्रिगेड नेही उमेदवार दिला आहे. (वार्ताहर)