शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

२००९ मध्ये मनसेवरच होता ईव्हीएम हॅकचा आरोप

By संजय पाठक | Published: July 14, 2019 2:01 AM

देशभरात विरोधी वातावरण असल्याचा समज असतानाही भाजपलाच बहुमत मिळाल्याने धक्का बसलेल्या विरोधकांनी भाजपकडून ईव्हीएम हॅक करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. मात्र, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमधून मनसेचे तीन आमदार अनपेक्षितरीत्या निवडून आल्यानंतर त्यावेळी नाशिकमध्येच मनसेने ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप १९ पराभूत उमेदवारांनी केला होता.

ठळक मुद्देनाशिकमधील विधानसभा ; १९ विरोधकांनी केला होता आरोप

नाशिक : देशभरात विरोधी वातावरण असल्याचा समज असतानाही भाजपलाच बहुमत मिळाल्याने धक्का बसलेल्या विरोधकांनी भाजपकडून ईव्हीएम हॅक करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. मात्र, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमधूनमनसेचे तीन आमदार अनपेक्षितरीत्या निवडून आल्यानंतर त्यावेळी नाशिकमध्येच मनसेने ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप १९ पराभूत उमेदवारांनी केला होता. कॉँग्रेसच्या माजी राज्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयापर्यंत नेलेले हे प्रकरण मागे पडले, परंतु अनपेक्षित निकालामुळे अशाप्रकारचे तर्कट त्यावेळी कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या विरोधकांनी केले होते. अर्थात, त्यावेळी अनपेक्षितरीत्या निवडून आले होते मनसे आमदार आणि आता भाजपचे खासदार इतकाच काय तो फरक!लोकसभा निवडणुकीत भाजपला पाशवी बहुमत मिळाल्यानंतर ईव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला त्यात राज ठाकरेदेखील सहभागी झाले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात एकत्रित लढा देण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे; मात्र मनसे नवा पक्ष असताना त्यांच्यावर सर्वप्रथम असे आरोप करण्यात आले होते. राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे प्रथमच विधानसभा निवडणूक लढविताना १३ आमदार निवडून आले होते. नाशिक शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांत मनसेचे आमदार निवडून आले. यात नाशिक पूर्वमधून (कै.) अ‍ॅड. उत्तमराव ढिकले, पश्चिममधून नितीन भोसले तर नाशिक मध्यमधून वसंत गिते हे स्वतंत्र लढलेले कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना-भाजप या पक्षांच्या प्रस्थापित नेत्यांना पराभूत करून निवडून आले होते. त्यावेळी कॉँग्रेस, राष्टÑवादीबरोबरच अन्य विरोधकदेखील हबकले होते. मनसेच्या विजयाच्या मागील कारणे शोधताना मग मनसेने ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी १९ पराभूत उमेदवार एकत्र आले. त्यानंतर ईव्हीएम हॅक होत असल्याच्या तक्रारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.कॉँग्रेसच्या माजी राज्यमंत्री आणि पराभूत उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी तर थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; मात्र नंतर खटला अर्धवट सोडून दिला. विशेष म्हणजे त्यावेळी बच्छाव यांनी बंगळुरूमधून एक अभियंता शोधून आणला आणि त्या अभियंत्याने मुंबईत ईव्हीएम हॅकचे प्रात्यक्षिक केले होते; परंतु ते त्यांच्या आणि बच्छाव यांच्या अंगलट आलेच, शिवाय फौजदारी कारवाईपर्यंत ते पोहोचले होते.कॉँग्रेसची सत्ता असल्यानेच मागे पडले प्रकरणकॉँग्रेसच्या माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी ईव्हीएम हॅक होत असल्याची तक्रार उच्च न्यायालयात केली होती. म्हणजेच हॅकिंगचा सर्वप्रथम लढा नाशिकमधूनच सुरू झाला होता; परंतु त्यावेळी देशात आणि राज्यात कॉँग्रेस आघाडीची सत्ता होती. (कै.) विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. सरकारला प्रतिवादी केल्यानंतर त्यांच्या विरोधातही लढा देण्याची वेळ आली होती. त्यासंदर्भात सरकारला भूमिका घ्यावी लागणार होती. आपल्या पक्षाच्या सरकारला अडचणीत टाकायचे नसल्याने बच्छाव यांनी खटला पुढे चालविलाच नाही.ईव्हीएम हॅकिंगचा आरोप आज राज ठाकरे करीत असले तरी चमत्कारीकरीत्या नाशिकमधून तीन आमदार निवडून आल्यानंतरच प्रथम आरोप त्यांच्याच पक्षाच्या आमदारांवर करण्यात आला होता. सध्या ईव्हीएम हॅकच्या निमित्ताने नाशिकमध्ये या चर्चेला या निमित्ताने उजाळा मिळत आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणMNSमनसे