मोदींच्या सभेप्रसंगी १७ मोबाइल चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:42 IST2019-09-20T22:40:28+5:302019-09-21T00:42:16+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तपोवन साधुग्राम येथे आलेल्या नागरिकांपैकी तब्बल १७ नागरिकांना आपले मोबाइल, तर दोघांना दुचाकी गमवावी लागली. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या मोबाइलवर चलाखीने डल्ला मारला

2 mobile thefts during Modi's rally | मोदींच्या सभेप्रसंगी १७ मोबाइल चोरीस

मोदींच्या सभेप्रसंगी १७ मोबाइल चोरीस

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तपोवन साधुग्राम येथे आलेल्या नागरिकांपैकी तब्बल १७ नागरिकांना आपले मोबाइल, तर दोघांना दुचाकी गमवावी लागली. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या मोबाइलवर चलाखीने डल्ला मारला.
वाहनतळात पोलिसांचा बंदोबस्त असूनही दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी हातोहात तेथून लंपास केल्या. एका महिलेचा पर्सदेखील हिसकावून चोरटे फरार झाले. एकूणच चोख सुरक्षाव्यवस्था व कडेकोट शेकडो पोलीस मोदींच्या सभास्थळी व परिसरात बंदोबस्तावर होते; मात्र चोरट्यांनी येथेही मोबाइल, दुचाकी चोरीचा डाव साधला. ज्या नागरिकांचे मोबाइल, दुचाकी, पर्स चोरीला गेले त्यांनी आडगाव
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते.

Web Title: 2 mobile thefts during Modi's rally