शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील मनपाच्या पुर्व विभागातील १९ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 21:08 IST

वाहतुकीला अडथळा ठरणा-या शहरातील विविध रस्त्यांवरील तसेच रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवार (दि.८)पासून आदेशाची अंमलबजावणी सुरू केली.

ठळक मुद्देन द्वारकेकडे येणारी वाहतूक काठेगल्ली सिग्नलवरून डावीकडे वळविण्यात आली धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेचा चौथा दिवस

नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रहदारीला अडथळा ठरणा-या अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेचा चौथा दिवस शनिवारी (दि.११) शांततेत पार पडला. दिवसभरात पूर्व विभागातील १९ धार्मिक स्थळे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.वाहतुकीला अडथळा ठरणा-या शहरातील विविध रस्त्यांवरील तसेच रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवार (दि.८)पासून आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दंगल नियंत्रण पथकासह राज्य राखीव दलाच्या तुकडीचा वाढीव बंदोबस्त या मोहिमेसाठी पुरविण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाणे हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलिसांचा फौजफाटा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकासोबत संरक्षणासाठी देण्यात आलेला होता.

मोहिमेला संभाजी चौक, उंटवाडी रस्त्यावरून सकाळी दहा वाजता प्रारंभ करण्यात आला. यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथक मुंबई नाकामार्गे शिवाजीवाडी, भारतनगर परिसरात पोहचले. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील एका धार्मिक स्थळाचा अतिक्रमित बांधकाम हटविल्यानंतर शिवाजीवाडीसमोरील वडाळा रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली. यानंतर वडाळारोडने पथक पखालरोडवर दाखल झाले. येथील एक लहान धार्मिक स्थळ हटविल्यानंतर पथक काठेगल्लीमार्गे द्वारकेवर पोहचले. दुपारी दोन वाजता द्वारका येथे पथक धडकल्यानंतर पुणे महामार्गावरील नाशिकरोडकडून द्वारकेकडे येणारी वाहतूक काठेगल्ली सिग्नलवरून डावीकडे वळविण्यात आली होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTempleमंदिरPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस