बल्क मेसेजद्वारे ९२ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:37 IST2019-10-13T00:36:28+5:302019-10-13T00:37:29+5:30
मोबाइल क्रमांकावर बनावट बल्क मेसेज पाठवून अज्ञात आरोपीने एका व्यक्तीच्या पेटीएम केवायसीचा बनाव करून सुमारे ९२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बल्क मेसेजद्वारे ९२ हजारांची फसवणूक
नाशिक : मोबाइल क्रमांकावर बनावट बल्क मेसेज पाठवून अज्ञात आरोपीने एका व्यक्तीच्या पेटीएम केवायसीचा बनाव करून सुमारे ९२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेटीएम वॉलेटद्वारे व्यवहार करणाऱ्या एका व्यक्तीला १० आॅक्टोबरला तुमची पेटीची रक्कम थांबवली जाण्याची शक्यता असल्याने तुमचे केवायसी पूर्ण करा, असा बल्क मेसेज पाठवून मोबाइलमध्ये क्वीक सपोर्ट नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर संशयिताने फिर्यादीला त्याची गोपनीय माहिती भरण्यास सांगितली.
या माध्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताने फिर्यादीच्या खात्यातून पेटीएम ट्रान्झक्शनद्वारे ९१ हजार ८१७ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षरक देवराज बोरसे करीत आहेत.