शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

बंद  फ्लॅटला १९ हजारांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:19 PM

नाशिक : संगणकीयप्रणाली असल्याने वीजबिलात कोणतीही चूक होत नसल्याने ग्राहकांचे वीज बिल हे बरोबरच असल्याचा दावा करणाऱ्या महावितरणने तीन महिने बंद घराचे वीज बिल चक्क १९ हजार रुपये इतके पाठविल्याची बाब उघडकीस आली आहे. वीज बिल भरावेच लागेल, असा पवित्रा महावितरणचे अभियंते घेत असल्याने शंकेचे निरसन करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

ठळक मुद्देअजब कारभार : लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या घरांना वीज आकारणी; महावितरणचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संगणकीयप्रणाली असल्याने वीजबिलात कोणतीही चूक होत नसल्याने ग्राहकांचे वीज बिल हे बरोबरच असल्याचा दावा करणाऱ्या महावितरणने तीन महिने बंद घराचे वीज बिल चक्क १९ हजार रुपये इतके पाठविल्याची बाब उघडकीस आली आहे. वीज बिल भरावेच लागेल, असा पवित्रा महावितरणचे अभियंते घेत असल्याने शंकेचे निरसन करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.चुकीचे आणि जादा वीज बिल आल्याची तक्रार सर्व ग्राहकांकडून होत असतानाही ग्राहकांच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आलेले वीज बिल हे बरोबरच असल्याची भूमिका घेत महावितरणच्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी ग्राहकांना आकड्याच्या घोळात अडकविण्याचे धोरण अवलंबिले असल्याचे या प्रकरणावरूनही समोर आले आहे.गंगापूररोडवरील रहिवासी बाळासाहेब कोल्हे यांच्या एका फ्लॅटमध्ये राहणारी मुले लॉकडाऊनमुळे आपापल्या गावी परतली असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून फ्लॅॅट बंद आहे. मात्र या फ्लॅटचे तीन महिन्यांचे वीज बिल १९,७४० इतके देण्यात आले आहे. ज्या घरात विजेचा एकही बल्ब सुरू नाही अशा ठिकाणचे मीटर रिडिंग अचूक कसे असू शकते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरमहा दीड ते दोन हजार वीज बिल येणाºया या फ्लॅटधारकाला १९ हजारांचे बिल देण्यात आल्याने तेही अचंबित झाले आहेत. दुसºया ग्राहकाला वीज बिल १४,१३० रुपयेपंचवटीतील हनुमानवाडी येथील विकास जाधव या ग्राहकालाही असाच काहीसा अनुभव आला आहे. दरमहा बाराशे ते दीड हजार इतके वीजबिल येत असताना लॉकडाऊनचे वीजबिल १४,१३० इतके वीजबिल पाठविण्यात आले आहे. आता महावितरण बिल भरण्यासाठी आग्रह करीत असून, तक्रार ऐकूनही घेतली जात नसल्याचा अनुभव जाधव यांना येत आहे.प्लॅट बंद असतानाही १९ हजारांचे वीज बिल कसे आले याचेच आश्चर्य वाटते. महावितरणकडून समाधान होऊ शकलेले नाही. त्यामुळे महावितरणच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करणार आहे.- बाळासाहेब कोल्हे,थत्तेनगर, गंगापूररोडग्राहकांचे समाधान करण्याची जबाबदारी असताना केवळ तांत्रिक मुद्दे सांगून ग्राहकांच्या माथी बिल मारले जात आहे. दरमहा येणाºया बिलाच्या तीनपट वीज बिल संशय निर्माण करणारे आहे.- विकास जाधव,हनुमानवाडी, पंचवटी

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज