भगूर नगरपालिकेचे १९ नगरसेवक अज्ञातस्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:36 IST2018-05-19T00:36:31+5:302018-05-19T00:36:31+5:30
नाशिक : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगूर नगरपालिकेचे १९ नगरसेवक नगराध्यक्षांसह सहलीसाठी रवाना झाल्याचे वृत्त आहे.

भगूर नगरपालिकेचे १९ नगरसेवक अज्ञातस्थळी
नाशिक : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगूर नगरपालिकेचे १९ नगरसेवक नगराध्यक्षांसह सहलीसाठी रवाना झाल्याचे वृत्त आहे. नगरसेवकांसह त्यांचे कार्यकर्ते आणि आप्तेष्ट दोन मोठ्या बसेसमधून अज्ञातस्थळी रवाना झाले असून, २० तारखेलाच ते नाशिकमध्ये परतणार आहेत असे समजते. सहलीसाठी जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अज्ञातस्थळी असल्याचे बोलले जात आहे.