राष्ट्रीय बाल स्वास्थ्यअंतर्गत १९ बालके उपचारासाठी मुंबईला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:08+5:302021-09-03T04:16:08+5:30

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून ३१ बालकांपैकी १९ बालकांना हृदय शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या ...

19 children sent to Mumbai for treatment under National Child Health | राष्ट्रीय बाल स्वास्थ्यअंतर्गत १९ बालके उपचारासाठी मुंबईला रवाना

राष्ट्रीय बाल स्वास्थ्यअंतर्गत १९ बालके उपचारासाठी मुंबईला रवाना

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून ३१ बालकांपैकी १९ बालकांना हृदय शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या पालकांसह जिल्हा रुग्णालय नाशिक येथून मुलुंडच्या फोर्टीस हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी. गांडाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात

यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी तथा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत खैरे उपस्थित होते. महिला व बाल रुग्णालय, मालेगाव येथे टूडी इको शिबिरे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात संशयित हृदयरुग्ण असलेल्या ९० बालकांची टू डी इको तपासणी करण्यात आली. त्यात ३१ बालकांना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे आढळले. या ३१ बालकापैकी १९ बालकांना पुढील उपचारासाठी फोर्टीस हॉस्पिटल, मुलुंड, मुंबई येथे पाठविण्यात आले असून उर्वरित बालकांना टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले. या उपक्रमासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हितेश महाले, जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिकचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक दीपक चौधरी, फोर्टीस हॉस्पिटलच्या अर्चना मेतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोट

०२ बालके

Web Title: 19 children sent to Mumbai for treatment under National Child Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.