शहरात १७२ झाडे अपघात प्रवण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:57 IST2019-05-30T00:57:11+5:302019-05-30T00:57:40+5:30
गंगापूररोडवर होरायझन अकॅडमीजवळ झाडावर मोटार आदळून झालेल्या अपघाताची घटना ही केवळ पहिली नाही. शहरात अशाप्रकारची अनेक झाडे रस्त्याच्या मधोमध असल्याने अपघात प्रवण आहेत.

शहरात १७२ झाडे अपघात प्रवण!
नाशिक : गंगापूररोडवर होरायझन अकॅडमीजवळ झाडावर मोटार आदळून झालेल्या अपघाताची घटना ही केवळ पहिली नाही. शहरात अशाप्रकारची अनेक झाडे रस्त्याच्या मधोमध असल्याने अपघात प्रवण आहेत. महपाालिकेच्या नोंदीनुसार १७२ झाडे रस्त्याच्या मधोमध असून ती न्यायालयाच्या आदेशामुळे हटविता येत नाही. आता देवराईच्या माध्यमातून देशी प्रजातीची झाडे लावल्यानंतर हाच संदर्भ उच्च न्यायालयात देऊन झाडे तोडण्याची परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
शहरातील विशेषत: गंगापूररोडवरील झाडे तोडण्याच्या विरोधात वृक्षप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर हा विषय अनेक वर्षे रेंगाळला होता.
जेहान सर्कल ते गंगापूर गावाच्या दरम्यान रस्ता तयार करताना महापालिकेला वृक्षतोड करावी लागणार होती. त्याला विरोध करताना ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी झाडे तोडावी, असे नागरी आंदोलनदेखील उभे राहिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने महापालिकेला झाडे तोडण्याच्या अटी-शर्तीवर परवानगी दिली.