नाशिक शहर व परिसरात महिला, अल्पवयीन मुलामुलींवर अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. मागील सहा महिन्यांत १७ बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच १०६ महिलांचा विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल झाले आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यांची उकल करत संशयितांना बेड्याही ठोकल्या; मात्र शहरात महिला, बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने चव्हाट्यावर आल्याचे दिसून येते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शहर व परिसरात कधी परिचितांकडून तर कधी अपरिचितांकडून महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात. याबाबतच्या तक्रारींचा ओघ विविध पोलिस ठाण्यांत सुरूच आहे.
नाशिक शहरात महिला अत्याचाराच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी 'दामिनी मार्शल' महिला पोलिसांचा चमू अधिकाधिक सक्रिय आहे. मात्र परिचितांकडूनच महिला, युवतींचा विश्वासघात होत असल्याचे अनेक घटनांमधून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ओळखीचा किंवा नातेसंबंधाचा गैरफायदा घेत संशयितांकडून महिलांवर अत्याचार किंवा विनयभंगासारखे प्रकार केले जातात. तसेच काही अल्पवयीन मुलामुलींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊनसुद्धा काही घटनांमध्ये त्यांचा लैंगिक छळ केल्याचे दिसून येते.
कधी घरात, तर कधी नोकरीच्या ठिकाणी छळ
महिलांच्याबाबतीत कधी घरामध्ये तर कधी नोकरीच्या ठिकाणीही छळ केला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नात्यातील व्यक्तींपासून तर कधी ओळखीच्या व परिचयाच्या व्यक्तीच महिलांच्या अत्याचारात आरोपी म्हणून निष्पन्न झाल्याचे तपासातून पुढे येते.
अत्याचाराचा व्हिडीओही पाठविला
गतिमंद मुलावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ पालकांच्या मोबाइलवर एका अज्ञात मोबाइल क्रमांकावरून संशयितांनी पाठविण्याला होता, असे फिर्यादीत म्हटले होते.
शाळकरी मुलींचा पाठलाग, छेड काढण्याचा प्रकार
काही दिवसांपूर्वीच वडाळा १ गावात एका शाळकरी मुलीचा पाठलाग करत छेड काढून तिचा विनयभंग सराईत गुन्हेगाराकडून करण्यात आल्याची घटना घडली होती.
इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, 3 अंबड, गंगापूररोड, भद्रकाली, सरकारवाडा पंचवटी, सातपूर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील शाळा, कॉलेजच्या परिसरात पोलिसांकडून साध्या वेशांमध्ये गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.