शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

कोम्बिंगमध्ये आढळले १५९ गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:35 IST

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांतील झोपडपट्टी भागात मंगळवारी (दि़१३) रात्री अचानक राबविलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये यादीवरील १५९ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली़

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांतील झोपडपट्टी भागात मंगळवारी (दि़१३) रात्री अचानक राबविलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये यादीवरील १५९ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली़ या गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयातील बराक नंबर सतरामध्ये ठेवून त्यांचे सध्याचे वास्तव्य व कामाबाबत सखोल विचारपूस करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी बुधवारी (दि़१४) पत्रकार परिषदेत दिली़  पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहरातील तेराही पोलीस ठाण्यांमध्ये अचानकपणे कोम्बिंग करण्यात आले़ कोम्बिंगपूर्वी आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांतील प्रमुखांना आपापल्या हद्दीतील गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सांगितली होती़ या यादीनुसार पोलिसांनी झोपडपट्टी तसेच स्लमभागात राहणारे तडीपार, दुचाकी चोर, गुन्हेगारांना आश्रय देणारे संशयित, वाहने यांची तपासणी केली़शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात हे कोम्बिंग आॅपरेशन राबविले. यादीवरील संशयितांच्या घरांची तपासणी करण्यात येऊन त्यांची चौकशी करण्यात आली, तसेच बाहेरचे संशयित या संशयितांकडे आश्रयाला आहेत का या दृष्टीनेही माहिती घेण्यात आली. पोलिसांनी या आॅपरेशनमध्ये रेकॉर्डवरील संशयित तपासून संशयास्पद वाहने व कागदपत्रे तपासली. या कोम्बिंगमध्ये पोलीस आयुक्तांसह गुन्हे व विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, विभाग दोनचे सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी