शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस प्रवक्ता पाटील यांच्या घरातून पंधरा लाखांचे सोन्याचे बिस्किटे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 14:12 IST

कपाटामध्ये ठेवलेली सोन्याची सुमारे पंधरा लाख रुपये किंमतीची पाच बिस्कीटे व दहा हजाराची रोकड १३ जानेवारी रोजी घेऊन पोबारा केला. तेव्हापासून आकाश कामावर येत नव्हता

ठळक मुद्दे१३ जानेवारी रोजी घेऊन पोबारा मंगळवारी (दि.१२) रात्रीच्या सुमारास लक्षात आले.

नाशिक : शहरातील टिळकवाडी येथे राहणाऱ्या कॉँग्रेस प्रवक्ता डॉ. हेमलता निनाद पाटील यांच्या बंगल्यातील कपाटात ठेवलेले सोन्याचे पाच बिस्कीटे व दहा हजाराची रोकड घेऊन नोकर तब्बल महिनाभरापूर्वी गायब झाला; मात्र त्यांचे पती फिर्यादी निनाद पाटील यांच्या हा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, संशयित नोकराच्या परभणी पोलिसांनी सेलू गावातून मुसक्या आवळल्या आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, टिळकवाडी येथे पाटील यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्यात बंडू म्हसे हे मागील अनेक वर्षांपासून नोकर म्हणून कार्यरत आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून त्यांचा मुलगा आकाश म्हसे हादेखील नोकर म्हणून रोजंदारीवर बंगल्यात कामाला येत होता. त्याने कपाटाची चावी चोरून कपाटामध्ये ठेवलेली सोन्याची सुमारे पंधरा लाख रुपये किंमतीची पाच बिस्कीटे व दहा हजाराची रोकड १३ जानेवारी रोजी घेऊन पोबारा केला. तेव्हापासून आकाश कामावर येत नव्हता तो परभणीच्या सेलू या मूळ गावी गेला असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, फिर्यादी पाटील यांनी कपाट उघडून बघितले असता कपाटामधील सोन्याची बिस्कीटे व रोकड नसल्याचे त्यांना मंगळवारी (दि.१२) रात्रीच्या सुमारास लक्षात आले. त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा संशयित आकाशविरूध्द दाखल करण्यात आला.दरम्यान, पोलिसांनी याबाबत परभणी पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी सेलू गावातून दोन ते चार दिवसांपुर्वी आकाश नावाच्या एका संशयिताला सोन्याची बिस्कीटे विक्री करताना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. त्याने चोरीचे बिस्कीटे नाशिकमधून आणल्याचे येथील पोलिसांनी सांगितले. तसा गुन्हा नाशिकला दाखल झाला आहे. दरम्यान, परभणी पोलिसांकडून संशयित आकाशला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असून पोलीस त्याची कसून चौकशी करत पुढील तपास करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयGoldसोनंtheftचोरी