नोकरीचे अमिष दाखवून नाशिकच्या बेरोजगार तरुणाची १५ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 17:36 IST2018-07-24T17:34:36+5:302018-07-24T17:36:39+5:30
नाशिक : एव्हिएशन सेक्टरमध्ये ग्राऊंड स्टाफ या पदावर नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून चौघा संशयितांनी बेरोजगार तरुणास सातत्याने फोन करून तसेच ईमेलद्वारे नियुक्तीपत्रे पाठवत वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे भरण्यास सांगून सुमारे पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरीचे अमिष दाखवून नाशिकच्या बेरोजगार तरुणाची १५ लाखांची फसवणूक
नाशिक : एव्हिएशन सेक्टरमध्ये ग्राऊंड स्टाफ या पदावर नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून चौघा संशयितांनी बेरोजगार तरुणास सातत्याने फोन करून तसेच ईमेलद्वारे नियुक्तीपत्रे पाठवत वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे भरण्यास सांगून सुमारे पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर - पाथर्डीरोडवरील शिवकॉलनीतील स्वप्निल दिलीप पंडिलवार या बेरोजगार तरुणाने सायबर पोलिसात फिर्याद दिली आहे. डिसेंबर २०१६ पासून नोकरीच्या शोधात असलेल्या स्वप्निलच्या मोबाईलवर अज्ञात संशयिताने संपर्क साधून एव्हीऐशन सेक्टरमध्ये ग्राऊंड स्टाफ या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. यानंतर संशयित करण ठाकूर याने ७२९०८४१०९६, ७५५०६८०५३९, ७८२७७१२९६३, ८८८२४६१९६१,९९७१०२४६५५, ८५१०९९३८५९ व ८१३०२७५६८० या मोबाईल क्रमांकांवरून, संशयित अलोक वर्मा याने, ८७४५०२००६५ या मोबाईल क्रमांकावरून, संशयित सुमित चव्हाण याने ८४५९१७४७५४ तर संशयित प्रदीप झा याने ७०६५९२६६७४ या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून वारंवार स्वप्निलला नोकरीचे अमिष दाखविले़
बेरोजगार असलेल्या स्वप्निला संशयितांच्या बोलण्यावर विश्वास बसला़ त्यानंतर संशयितांनी ई-मेलच्या माध्यमातून स्वप्निलकडून कागदपत्रे मागवून घेतली व त्यावरुन नियुक्तीपत्रे पाठविली़ तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षण शुल्क व इतर कारणांच्या नावे वेळोवेळी स्वप्निलला बँकेत पैसे भरण्यास सांगितले़ संशयितांच्या सांगितलेल्या बॅक अकाऊंटवर स्वप्निलने १४ लाख ५४ हजार रुपये भरले़ मात्र पैसे भरूनही आपल्याला नोकरी मिळत नसल्याचे तसेच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच स्वप्निलने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली़