शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

१४ अवैध शस्रे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:56 IST

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आठवडा शिल्लक राहिला असून, आचारसंहिता काळात परवानाधारक शस्रेदेखील पोलिसांकडे जमा करावी लागतात; मात्र शहरात १४ व्यक्तींनी शस्रे कुठलेही सबळ कारण पोलिसांना न देता स्वत:जवळच बाळगल्याने त्यांची शस्रे अवैध ठरवून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआचारसंहिता : २८७ परवानाधारकांची २१० शस्रे जमा

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आठवडा शिल्लक राहिला असून, आचारसंहिता काळात परवानाधारक शस्रेदेखील पोलिसांकडे जमा करावी लागतात; मात्र शहरात १४ व्यक्तींनी शस्रे कुठलेही सबळ कारण पोलिसांना न देता स्वत:जवळच बाळगल्याने त्यांची शस्रे अवैध ठरवून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार शहरातील सुमारे १२८५ परवानाधारकांपैकी २७६ परवानाधारकांची २९२ शस्रे तात्पुरते जमा करण्याबाबत तसेच परवाना नूतनीकरण न केलेल्या ११ परवानाधारकांकडील ११ शस्रे अशी एकूण २८७ परवानाधारकांची मिळून ३०३ शस्रे तात्पुरत्या स्वरूपात जमा करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. यापैकी अद्याप २१० शस्रे पोलिसांकडे जमा झाली आहे. यामध्ये केवळ राजकीय छबी असलेल्या शस्र परवानाधारकांचा समावेश आहे. सर्वसामान्य परवानाधारकांची शस्रे जमा केली नसल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.शहरात कोठेही कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या यादीवरील सराईत गुन्हेगारांची चाचपणी केली जात आहे. त्यानुसार सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या हद्दपारदेखील करण्यात येत आहे. तसेच काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उपद्रवी लोकांना स्थानबद्धदेखील करण्यात येत आहे.विधानसभा निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून तर थेट निकालाच्या दिवसापर्यंतची शहरातील सर्व मतदान केंद्रे, पाच स्ट्रॉँग रूम, संवेदनशील मतदान केंद्रे, प्रचार फेऱ्या, प्रचारसभा याबाबत चोख बंदोबस्त व सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. बेकायदेशीरपणे शस्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत उपद्रवी संशयित एक हजारांपेक्षा अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सराईत गुन्हेगारांपैकी ९७ गुन्हेगारांना शहरासह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. दहा ते बारा संशयितांवर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये गुन्हे दाखल क रण्यात आले आहेत.शस्रांबरोबरच ८४ लाखांची दारू जप्तआचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहराच्या ग्रामीण भागातील सीमावर्ती नाक्यांवर कारवाई करीत आतापर्यंत सुमारे ८४ लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. यामध्ये हजारो लिटर दारूचा समावेश आहे. मद्याचा अवैधसाठा हा कें द्रशासित प्रदेशांमध्ये निर्मित असून, त्याची विक्री राज्यात करण्याचा डाव भरारी पथकांनी उधळला. निवडणूक काळात अशाप्रकारच्या मद्याला मागणी वाढून तस्करीला वेग येतो. त्यामुळे सीमावर्ती नाक्यांसह भरारी पथक सक्रिय करण्यात आले आहे. सर्वाधिक कारवाई त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा तालुक्यांत करण्यात आली आहे.४ शहर पोलिसांनी अद्यापपर्यंत ४ लाख ५८ हजार रूपयांची अवैधरित्या वाहतूक केली जाणारी रोकड जप्त केली आहे. तसेच मादक पदार्थांमध्ये ८६ लाख ८७८ किलो गांजा, १३८ लिटर दारू, ७ गावठी कट्टे, ११ जीवंत काडतुसे, ३ तलवार, १ चॉपर अशी शस्त्रेही जप्त करू न संबंधितांवर कारवाई केली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस