वणीत १३ हजार क्विंटल कांदा आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 00:16 IST2021-06-02T19:43:27+5:302021-06-03T00:16:07+5:30
वणी : पावसाळी वातावरण व कांदा खराब होण्याच्या भीतीमुळे कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर उपबाजारात कांदा विक्रीसाठी आणत असून बुधवारी (दि. २) १३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

वणीत १३ हजार क्विंटल कांदा आवक
वणी : पावसाळी वातावरण व कांदा खराब होण्याच्या भीतीमुळे कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर उपबाजारात कांदा विक्रीसाठी आणत असून बुधवारी (दि. २) १३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.
दिंडोरी व वणी अशा दोन ठिकाणी कांदा खरेदी - विक्रीचे व्यवहार होतात. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत या दोन्ही ठिकाणचे कामकाज चालते. मात्र दिंडोरीच्या तुलनेत वणी येथे कांदा खरेदी - विक्रीचे व्यवहार मोठ्या फरकाने होतात.
दिंडोरीपेक्षा वणीत कांद्याची आवक जास्त होते. बुधवारी (दि. २) उपबाजारात ४९७ वाहनांमधून १३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. २१८२ रुपये कमाल, १४०० रुपये किमान तर १७०० रुपये प्रति क्विंटल सरासरी अशा दराने कांदा खरेदी-विक्री व्यवहार पार पडले. वणी उपबाजारात आठवडाभरापासून मोठी आर्थिक उलाढाल कांदा आवकेमुळे होत आहे. त्यात कांदा भरण्यासाठी गोण्या, सुतळी, कांदा वाहतूक करणारी वाहने या व्यवसायातही उलाढाल होत असून वणी - सापुतारा रस्त्यावर कांदा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रांगा लागत आहेत.