Nashik: नाशिकमध्ये १३०० सरपंच पोहचले 'शासन दरबारी '
By संदीप भालेराव | Updated: July 15, 2023 12:57 IST2023-07-15T12:56:39+5:302023-07-15T12:57:19+5:30
Nashik: शासन आपल्या दारी उपक्रमासाठी जिल्ह्यातील सुमारे तेराशे सरपंच, उपसरपंच उपस्थित झाले आहेत. कार्यक्रम स्थळी त्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.

Nashik: नाशिकमध्ये १३०० सरपंच पोहचले 'शासन दरबारी '
- संदीप भालेराव
नाशिक : शासन आपल्या दारी उपक्रमासाठी जिल्ह्यातील सुमारे तेराशे सरपंच, उपसरपंच उपस्थित झाले आहेत. कार्यक्रम स्थळी त्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
नाशिक मधील डोंगरे वसतिगृह मैदानावर शासन आपल्या दारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाभरातून हजारो नागरिक सोहळ्यासाठी उपस्थित झाले आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सरपंच आणि उपसरपंच यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या मुख्य मंडपात सरपंचांसाठी विशेष व्यवस्था असून फेटा बांधून सर्व सरपंचांचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यासाठी सुमारे पंचवीस हजार नागरिक उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो नागरिक कार्यक्रमाच्या ठिकाणी झाले आहेत.