चांदवड तालुक्यातील राहुड घाटात भीषण अपघात, १३ जण जखमी तर ७ जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:04 AM2020-05-11T11:04:01+5:302020-05-11T11:04:22+5:30

अपघातातील जखमीना चांदवड उपजिल्हा रुग्णालय व काहींना मालेगाव येथे नेण्यात आले.

13 killed, 7 injured in road mishap in Chandwad taluka nashik | चांदवड तालुक्यातील राहुड घाटात भीषण अपघात, १३ जण जखमी तर ७ जण गंभीर

चांदवड तालुक्यातील राहुड घाटात भीषण अपघात, १३ जण जखमी तर ७ जण गंभीर

googlenewsNext

चांदवड (नाशिक)- तालुक्यातील राहुड घाटात मजूरांना घेऊन जाणाऱ्या दोन ट्रक, एक आयशर व पुढे जाणारी कार यांच्यात सकाळी आठ वाजेच्या सुमारास अपघात झाला . कारचा वेग कमी झाल्याने आयशर आदळली व त्या पाठोपाठ दोन ट्रकनी पाठीमागून धडक दिली.  

अपघातातील जखमीना चांदवड उपजिल्हा रुग्णालय व काहींना मालेगाव येथे नेण्यात आले. अपघातात सहा ते सात जण गंभीर जखमी तर इतर १२ ते १३ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. राहुड घाटात काही काळ वाहतुक ठप्प झाली. चांदवड सोमा कंपनीचे कर्मचारी व पोलीस घटना स्थळी पोहचले व मदतकार्य सुरू केले आहे.

 

Web Title: 13 killed, 7 injured in road mishap in Chandwad taluka nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात