जिल्ह्यात १११ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 01:52 IST2021-07-12T01:51:45+5:302021-07-12T01:52:31+5:30

जिल्ह्यात रविवारी (दि. ११) एकूण १११ नागरिक कोरोनामुक्त झाले असून १८८ रुग्णसंख्येची भर पडली आहे. रविवारी कोरोनामुक्तच्या तुलनेत नवीन रुग्णसंख्या वाढली असताना दिवसभरात बळी गेलेल्यांची संख्यादेखील ७ वर पोहोचली असल्याने एकूण बळींची संख्या ८,४३१ वर पाेहोचली आहे.

111 corona free in the district | जिल्ह्यात १११ कोरोनामुक्त

जिल्ह्यात १११ कोरोनामुक्त

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. ११) एकूण १११ नागरिक कोरोनामुक्त झाले असून १८८ रुग्णसंख्येची भर पडली आहे. रविवारी कोरोनामुक्तच्या तुलनेत नवीन रुग्णसंख्या वाढली असताना दिवसभरात बळी गेलेल्यांची संख्यादेखील ७ वर पोहोचली असल्याने एकूण बळींची संख्या ८,४३१ वर पाेहोचली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांपैकी ९७ रुग्ण नाशिक ग्रामीणचे, ७९ नाशिक मनपा क्षेत्रातील, ५ मालेगाव मनपा आणि ७ जिल्हा बाह्य क्षेत्रातील आहेत. तर ७ बळींपैकी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५ तर नाशिक मनपाचे २ बळी आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्येत पुन्हा भर पडली असून ती रविवारी १,९०८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णसंख्येचा दर ९७.४२ वर कायम असून प्रलंबित अहवालांची संख्या ३३७ पर्यंत खाली आली आहे.

Web Title: 111 corona free in the district