नाशकात चक्कर येऊन ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 01:37 AM2021-04-21T01:37:05+5:302021-04-21T01:38:14+5:30

शहर परिसरामध्ये मागील आठवडाभरापासून छातीत वेदना, श्वासोच्छ्वास त्रास आणि चक्कर येऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. सोमवारी शहराच्या विविध भागांत अशा प्रकारे ११ लोक दगावल्याची अकस्मात नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

11 die due to dizziness in Nashik | नाशकात चक्कर येऊन ११ जणांचा मृत्यू

नाशकात चक्कर येऊन ११ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देहे राम...: श्वास घेण्यास त्रास अन् छातीत वेदनांचे निदान

नाशिक : शहर परिसरामध्ये मागील आठवडाभरापासून छातीत वेदना, श्वासोच्छ्वास त्रास आणि चक्कर येऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. सोमवारी शहराच्या विविध भागांत अशा प्रकारे ११ लोक दगावल्याची अकस्मात नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अचानकपणे अशा प्रकारे नागरिकांचा राहत्या घरी मृत्यू होत असल्याने प्रशासकीय यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहे. आठवडाभरपूर्वी नऊ लोक अशा प्रकारे दगावले होते. सोमवारी पुन्हा या कारणांनी तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे.
आशाबाई बनसोडे(५५,रा.सातपूर), रमेश चन्ना(६६,अशोकामार्ग), सुरेखा केंद्रे(५८,रा.गोविंदनगर), सुधाकर जठार(७०,रा. कामटवाडे), विलास बारगळ(५२,रा. सिन्नरफाटा), कचरू माळी(७८,रा. नाशिक रोड), सिकंदर सय्यद (६०, रा.नाशिक), वत्साबाई नरवडे (८१, रा.शिवाजीनगर, धर्माजी कॉलनी), विमलबाई महाले(७९,पेठ रोड), ज्योती गायकवाड(४७, गंजमाळ) यांच्यासह एका अनोळखी पुरुषाचा वरील कारणांनी मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे
n चक्कर येणे किंवा तत्सम प्रकाराने मृत्यू झाल्याची स्वतंत्र नोंद नसते. संबंधित डॉक्टरांनी काय दाखला दिला त्यात ते स्पष्ट होऊ शकते, कारण चक्कर येऊन पडणे आणि मृत्यू हे हजार आजारांचे लक्षण आहे, असे महापालिकेचे कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.. 

Web Title: 11 die due to dizziness in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.