बागलाण तालुक्यात १०८ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:17 IST2020-07-23T21:27:40+5:302020-07-24T00:17:50+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यात्त आतापर्यंत १०८ जणांना कोरोनापासून दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा कहर सुरूच असुन आज गुरु वारी (दि.२३) पुन्हा दोन जण बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाला आहे .

बागलाण तालुक्यात १०८ कोरोनामुक्त
सटाणा : बागलाण तालुक्यात्त आतापर्यंत १०८ जणांना कोरोनापासून दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा कहर सुरूच असुन आज गुरु वारी (दि.२३) पुन्हा दोन जण बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाला आहे . त्यामध्ये दोन महिला ,एक तरु णाचा समावेश आहे़ बागलाण तालुक्यातील सटाणा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आज अखेर ३४ कोरोना बाधित उपचार घेत आहे .तर १०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत .मात्र कोरोनाचा फैलाव वाढत असुन गुरु वारी पाच जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत .पाचही अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत .त्यामध्ये डांगसौंदाणे येथील ६८ वर्षीय वृध्द , ४६ वर्षीय महिला , २६ वर्षीय तरु ण व सटाणा शहरातील बाजार पेठेतील ४६ वर्षीय पुरु ष व मित्रनगर मधील वृध्द महिलेचा समावेश आहे .
दरम्यान काल नवे निरपूर ,मोरेनगर येथे प्रत्येकी एक बाधित आढळले आहेत .सरपंच शरद सूर्यवंशी ,सुरेश मोरे यांनी तत्काळ संपूर्ण
गावात फवारणी करून तीन दिवस
गाव लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे .सटाणा शहरातील मित्रनगर ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे .