शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांची १०४ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 01:05 IST

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये १०४ नायब तहसीलदारांचे पदे गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असून, यामुळे महसूल यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम तर होतोच; परंतु निव्वळ पदोन्नती समितीच्या बैठकीअभावी पदोन्नती मिळत नसल्याचे पाहून सेवानिवृत्तीच्या समीप पोहोचलेले कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

नाशिक : नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये १०४ नायब तहसीलदारांचे पदे गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असून, यामुळे महसूल यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम तर होतोच; परंतु निव्वळ पदोन्नती समितीच्या बैठकीअभावी पदोन्नती मिळत नसल्याचे पाहून सेवानिवृत्तीच्या समीप पोहोचलेले कर्मचारी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे महसुलमंत्र्यांनी एका महिन्यात पदोन्नतीचे प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते, त्याला देखील दहा महिने उलटून गेले आहेत.नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व नगर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत नायब तहसीलदारांची १०४ पदे रिक्त झाली असून, अशा पदांवर मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांना कालबद्ध पदोन्नती दिली जाते. या संदर्भात विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाने वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून रिक्तपदांची माहिती मागवितानाच पदोन्नत होऊ पाहणाºया अव्वल कारकून व मंडळ अधिकाºयांच्या प्रस्तावही घेतले. परंतु विभागीय पातळीवर महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विभागीय पदोन्नती समितीची बैठकच होत नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून नायब तहसीलदार पदावर पदोन्नतीच देण्यात आलेली नाही.गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात नाशिक भेटीवर आलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महसूल अधिकाºयांच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर पाटील यांनी एका महिन्यात हा प्रश्न निकाली निघेल, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यांच्या आश्वासनालाही दहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास नायब तहसीलदार पदाच्या पदोन्नत्या पुन्हा आचारसंहितेच्या कचाट्यात अडकतील, त्यानंतर पुन्हा काही महिन्यांतच विधानसभा निवडणुकीची तयारी होणार असल्याने पदोन्नती मिळते की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.अनेक जण सेवानिवृत्तीच्या समीपऔरंगाबाद विभागाने गेल्या तीन वर्षात दोन वेळा नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीचे आदेश काढले. नाशिक विभागाची याबाबतची उदासीनता अनाकलनीय ठरली आहे. पदोन्नत होऊ पाहणारे काही अव्वल कारकून व मंडळ अधिकारी आता सेवानिवृत्तीच्या समीप पोहोचले असून, त्यांना वेळीच पदोन्नती मिळाली असते तर त्यांना दर्जा व वेतनाचा लाभ मिळू शकला असता; परंतु तसे झाले नाही.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयTahasildarतहसीलदार