१०३ बाधित; ५९ कोरोनामुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 01:47 IST2022-07-18T01:47:11+5:302022-07-18T01:47:40+5:30
जिल्ह्यात रविवारी एकूण १०३ रुग्ण नव्याने बाधित झाले असून, ५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद न झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८९०२ वर कायम आहे.

१०३ बाधित; ५९ कोरोनामुक्त !
नाशिक : जिल्ह्यात रविवारी एकूण १०३ रुग्ण नव्याने बाधित झाले असून, ५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद न झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८९०२ वर कायम आहे. दरम्यान, दिवसभरात मोठ्या प्रमाणात अहवाल प्राप्त झाल्याने प्रलंबित अहवालांची संख्या एका आकड्यात अर्थात केवळ नऊवर आली आहे. मात्र, मुक्तपेक्षा बाधितांची संख्या अधिक असल्याने उपचारार्थी रुग्णसंख्या सातशेचा आकडा ओलांडत ७०९ पर्यंत पोहोचली आहे. तसेच कोरोनामुक्ततेच्या दरातही घट येऊन हा आकडा प्रथमच ९८ टक्क्यांखाली म्हणजेच ९७.९९ टक्के, तर पॉझिटिव्हिटीचा दर ३.७७ टक्के आहे.