अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्ष सक्त मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 00:26 IST2021-08-06T00:25:46+5:302021-08-06T00:26:05+5:30

सातपूरच्या कृष्णनगर येथील शीतल अपार्टमेंट येथे आठ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपी अकिल गुलाब मनियार (३८, रा. आंबेडकर भाजी मार्केटजवळ, सातपूर) याला अतिरिक्त सहजिल्हा न्यायाधीश डी.डी. देशमुख यांनी गुरुवारी (दि. ५) १० वर्षांचा सश्रम कारावास व सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली असून दंड न भरल्यास अतिरिक्त चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

10 years hard labor for sexually abusing a minor | अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्ष सक्त मजुरी

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्ष सक्त मजुरी

नाशिक : सातपूरच्या कृष्णनगर येथील शीतल अपार्टमेंट येथे आठ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपी अकिल गुलाब मनियार (३८, रा. आंबेडकर भाजी मार्केटजवळ, सातपूर) याला अतिरिक्त सहजिल्हा न्यायाधीश डी.डी. देशमुख यांनी गुरुवारी (दि. ५) १० वर्षांचा सश्रम कारावास व सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली असून दंड न भरल्यास अतिरिक्त चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सातपूरच्या कृष्णनगर भागात ६ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ७.३० वाजता शीतल अपार्टमेंटच्या टेरेसवर ही घटना घडली होती. अकिल मनियार याने आठ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याला अत्याचाराची घटना कोणास सांगितली तर जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर.सी. अवतारे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून दीपशिखा भिडे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: 10 years hard labor for sexually abusing a minor