शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथचे १० साईभक्त ठार; खासगी बस- ट्रकची टक्कर, अपघातात ३४ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 06:18 IST

सिन्नर-शिर्डी मार्गावर अपघात

- शैलेश कर्पे

नाशिक : सिन्नर-शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस व ट्रक यांच्यात शुक्रवारी पहाटे टक्कर होऊन खासगी बसची एक बाजू कापली गेली. या भीषण अपघातात अंबरनाथ परिसरातील दहा साईभक्तांचा मृत्यू झाला. त्यात सहा महिला, दोन पुरुष व दोन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातात उल्हासनगर, कल्याण, बदलापूर परिसरातील ३४ जण जखमी झाले. २३ जखमींवर सिन्नरला उपचार सुरु असून उर्वरित जखमींना उपचारानंतर पाठवण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनचालक किरकोळ जखमी झाले. 

अंबरनाथच्या लक्ष्मीनारायण प्रिंटिंग ॲण्ड पॅकेजिंग कंपनीने कामगार व त्यांच्या नातेवाईकांसाठी माेफत शिर्डी दर्शनासाठी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास १२ खासगी बस व अन्य तीन छोटी वाहने नेली होती. वावी गावानंतर एक आराम बस व ट्रक यांची टक्कर झाली. जखमींना सिन्नरच्या यशवंत आणि मातोश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील २१ जखमी यशवंत रुग्णालयात उपचार घेत असून सहा जण गंभीर जखमी आहेत. तीनजण मातोश्री रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

रक्ताचा सडा आणि काचेचा खच

अपघातानंतर दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. खासगी बस उलटल्याने साखरझोपेत असलेल्यांना जोरदार धक्का बसला. खासगी बस कापली जाऊन उलटतानाच दहा जण ठार, तर ३४ जण जखमी झाले. घटनास्थळी रक्ताचा सडा आणि काचेचा खच साचला होता. जखमींचा आक्रोश मन सुन्न करणारा होता.

 मृतांच्या नातलगांना पाच लाख रुपयांची मदत 

अपघात झाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी सिन्नरला धाव घेतली. जखमींना धीर देत सर्व खर्च शासकीय मदतीतून करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची माहिती घेतली आहे. मृतांच्या नातलगांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचे भुसे म्हणाले.

मृतांची नावे : श्रद्धा सुहास बारस्कर (३५), श्रावणी सुहास बारस्कर  (९), नरेश मनोहर उबाळे (३८), वैशाली नरेश उबाळे (३२), चांदनी निर्मल गच्छे (१३), बालाजी कृष्ण महंती (२८), अंशुमन बाबू महंती (७), रोशनी राजेश वाडेकर (३६) सर्व राहणार मोरीवली, ता. अंबरनाथ. दीक्षा संतोष गोंधळी (१७) रा. एकवीरा प्लाझा, चिंचपाडा, कल्याण (पू.), प्रमिला प्रकाश गोंधळी (४५) रा. हातीब, ता. संगमेश्वर.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकDeathमृत्यूsaibabaसाईबाबा