दहा जुगाºयांना अटक : नाशिकरोड, सातपूर याठिकाणी छापामारी जुगार अड्ड्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:06 IST2018-02-05T01:05:27+5:302018-02-05T01:06:47+5:30

नाशिक : शहर पोलिसांनी शनिवारी (दि़३) अंबड, नाशिकरोड व सातपूर या तीन ठिकाणी छापामारी करून दहा जुगाºयांना ताब्यात घेतले

10 juga arrested: Raids on raid gambling places in Nashik Road, Satpur | दहा जुगाºयांना अटक : नाशिकरोड, सातपूर याठिकाणी छापामारी जुगार अड्ड्यांवर छापे

दहा जुगाºयांना अटक : नाशिकरोड, सातपूर याठिकाणी छापामारी जुगार अड्ड्यांवर छापे

ठळक मुद्देरोख रकमेसह जुगाराचे साहित्य दोघांनाही ताब्यात घेतले

नाशिक : शहरातील विविध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, छापामारी सुरू केली आहे़ शहर पोलिसांनी शनिवारी (दि़३) अंबड, नाशिकरोड व सातपूर या तीन ठिकाणी छापामारी करून दहा जुगाºयांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २१ हजार रुपयांच्या रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ अंबड लिंकरोडवरील एऩ एम़ एंटरप्रायजेस दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार शुक्रवारी (दि़२) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला़ त्यावेळी संशयित किरण संजय जाधव (२७, रा़हरी ओम रोह हाउस नंबर ४, साईविजय हॉटेलच्या पाठीमागे, साईग्राम, अंबड) व त्याचे सहा साथीदार हे पत्त्याच्या कॅटवर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़ पोलिसांनी या संशयितांकडून रोख रकमेसह २० हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त केले़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ एकलहरा गेटजवळील मोकळ्या जागेवर नाशिकरोड पोलिसांनी शनिवारी (दि़३) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी संशयित दीपक रामा धोत्रे (३५) व एकनाथ बाबूराव बोराडे (५९, रा़ एकलहरा गेट, सामनगावरोड, नाशिकरोड) हे स्वत:च्या फायद्यासाठी कल्याण बाजार नावाचा अंक आकड्यावर पैसे लावून व घेऊन मटका जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले़ पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सातपूर परिसरात टाकला छापा
सातपूर परिसरातील कार्बन नाका परिसरात पोलिसांनी शनिवारी (दि़३) दुपारी छापा टाकला़ या ठिकाणी संशयित संजय रामलाल बागुल (४५, रा़द्वारकामाई अपार्टमेंट, धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, सातपूर) हा जुगाराचे साहित्य व कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना व खेळविताना आढळून आला़ पोलिसांनी बागुल यास ताब्यात घेतले असून, त्याच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला़

Web Title: 10 juga arrested: Raids on raid gambling places in Nashik Road, Satpur

टॅग्स :Crimeगुन्हा