लासलगावी गत सप्ताहात १ लाख क्विंटल कांद्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 23:54 IST2021-05-29T23:51:57+5:302021-05-29T23:54:56+5:30
लासलगाव : गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची १ लाख १६ हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ६००, कमाल २०२१ रुपये, तर सर्वसाधारण रुपये १५७६ रुपये प्रति क्विंटल राहिले.

लासलगावी गत सप्ताहात १ लाख क्विंटल कांद्याची आवक
ठळक मुद्देउन्हाळ कांद्याला कमाल भाव २०२१
लासलगाव : गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची १ लाख १६ हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ६००, कमाल २०२१ रुपये, तर सर्वसाधारण रुपये १५७६ रुपये प्रति क्विंटल राहिले.
लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्या बारा दिवसांच्या बंदनंतर पूर्ववत चालू झाल्या. लासलगावी उन्हाळ कांद्याला कमाल भाव २०२१ रुपये राहिला, तर निफाड उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची २७ हजार ३८५ क्विंटल आवक होऊन भाव ५०१ ते १७५१ रुपये व सरासरी १४०० रुपये राहिले. विंचूर उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची ७३ हजार ६६४ क्विंटल आवक होऊन भाव ७०० ते २०४० रुपये व सरासरी १५०० रुपये राहिले.