रावळगावी १ लाख ६८ हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:49 IST2018-08-25T00:48:55+5:302018-08-25T00:49:35+5:30
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील गुदामावर छापा टाकून सतीश देवराम वडक्ते यांनी साठा केलेला १ लाख ६८ हजार १३० रुपये किमतीचा नामांकित कंपनीचा गुटखा अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केला आहे.

रावळगावी १ लाख ६८ हजारांचा गुटखा जप्त
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील गुदामावर छापा टाकून सतीश देवराम वडक्ते यांनी साठा केलेला १ लाख ६८ हजार १३० रुपये किमतीचा नामांकित कंपनीचा गुटखा अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केला आहे. रावळगाव येथे अवैधरीत्या गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस हवालदार देवीदास निकम, नितेश खैरनार, अभिजित साबळे, दिनेश शेरावते आदींनी छापा टाकून गुदामातील १ लाख ६८ हजार १३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.