जलपुनर्भरणासाठी तळोद्यातील युवक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:25 PM2019-06-15T12:25:18+5:302019-06-15T12:25:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भविष्यात पुन्हा दुष्काळी आणि पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये म्हणून त्यावर मात करण्यासाठी तळोदा शहरातील ...

The youth of Pallod gathered to replenish the water | जलपुनर्भरणासाठी तळोद्यातील युवक एकवटले

जलपुनर्भरणासाठी तळोद्यातील युवक एकवटले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : भविष्यात पुन्हा दुष्काळी आणि पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये म्हणून त्यावर मात करण्यासाठी तळोदा शहरातील तरूण एकवटले असून, या तरूणांनी  येथील महसूल प्रशासनाची भेट घेऊन शासकीय विहिरी व कुपनलिकांमध्ये जलपुनर्भरण उपक्रम राबविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी नगरपालिकेकडे कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रभारी तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली.
एकेकाळी पाण्यासाठी संपूर्ण तळोदा तालुका सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जात होता. कारण अवघ्या 20 ते 25 फुटावर पाणी होते. तथापि, अलिकडच्या 10 ते 12 वर्षापासून सातत्याने पजर्न्यमानात घट होत असल्यामुळे तळोदा वासियांनाही पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. यंदा तर सरासरीच्या निम्मेही पाऊस न झाल्यामुळे शहराबरोबरच तालुक्याच्या इतिहासात प्रथमच भीषण दुष्काळाची परिस्थिती          निर्माण झाली आहे. या दुष्काळी स्थितीबाबत सर्व सामान्यांमध्ये चर्चा होत असतांना दिसून येत आहे. माळी समाजातील तरूण वर्गाने तर सर्वाच्या सहकार्यातून नदी नांगरटी आणि खोलीकरणाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेतली आहे. साहजिकच इतर तरूणांनीदेखील भविष्यात दुष्काळी स्थिती व पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून पावसाचे वाया जाणा:या पाण्यातून जलपुनर्भरण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने तरूणांनी गुरूवारी               नायब तहसीलदार रामजी राठोड             यांची भेट घेतली होती. त्यांनी शहरातील विविध शासकीय              विहिरी व कुपनलिका पुनर्भरण करण्याची भावना बोलून दाखविली. विशेषत: मोठा माळीवाडय़ातील डॉ.मगरे यांच्या घरासमोर  15 वर्षापूर्वी तत्कालीन नगरसेवकांनी बोअरवेल केलेली आहे. त्या शेजारीच नगरपरिषदेची जुनी विहीर असून, त्यावर सद्याच्या परिस्थितीत सिमेंट क्राँक्रिटचा स्लॅब टाकून विहीर बंद करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे या कुपनलिकेची पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे ती निकामी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लागून असलेल्या शेजारच्या विहिरीत लोकसहभागातून रेनवॉटर हाव्रेस्टींगसारखा उपक्रम राबविण्याचा आमचा मानस असून, पावसाचे पाणी सोडण्याकामी विहीर मोकळी करून द्यावी, अशी मागणी चंद्रकांत रामदास मगरे, दीपक राजाराम देवरे, हेमलाल धरमदास माळी, अनिल रमेश शिंपी, नीलेश धरमदास माळी, मनोज दगडू सूर्यवंशी, डॉ.सुहास गोविंद राणे यांनी केली आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमिवर संपूर्ण शहरवासी एकवटून लोकसहभागातून व लोकवर्गणीतून गेल्या आठ ते दहा दिवसांपासन अहोरात्र जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर करीत आहेत. विशेषत: तरूणवर्ग यात अधिक सक्रीय आहेत. त्यांचा उत्साह पाहून स्वयंसेवी संस्था, सामाजिक ग्रुप, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देवून आर्थिक मदत करीत आहेत. मात्र प्रशासनातील सर्वच यंत्रणातील अधिका:यांना कामाच्या ठिकाणी साधी भेट देण्यास वेळ मिळू नये असा प्रश्न उपस्थित करून दुष्काळी परिस्थतीबाबत अधिका:यांच्या असंवेदनशीलतेविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन वेगवेळ्या उपाययोजना राबवित आहे. प्रशासन या उपाययोजनांना तर सोडा नागरिक स्वत:हून लोसहभागातून लोकवर्गणीतून कामे करण्यासाठी पुढे येत आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकी देणे अपेक्षीत असतांना साधी विचारपूस केली नसल्याचे कार्यकत्र्याचे म्हणणे आहे. याउलट जिल्हा प्रशासनाने कामासाठी नाम फाऊंडेशनचे पोकलेन यंत्र उपलब्ध करून देवून कामांबाबत कार्यकत्र्याशी संवादही साधत आहेत.  एवढेच  नव्हे तर पुढील दोन-तीन दिवसात प्रत्यक्ष कामावर येवून भेट देण्याचेही कार्यकत्र्याना आश्वासीत केले आहे.

Web Title: The youth of Pallod gathered to replenish the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.