धावलघाटात दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:53 PM2020-09-30T12:53:42+5:302020-09-30T12:53:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव ते शहादा रस्त्यावर धावलघाटात नाल्याजवळ दुचाकी अपघात जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ ...

Youth dies in two-wheeler accident | धावलघाटात दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

धावलघाटात दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धडगाव ते शहादा रस्त्यावर धावलघाटात नाल्याजवळ दुचाकी अपघात जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ १९ सप्टेंबर रोजी हा अपघात घडला होता़
धडगाव तालुक्यातील कामोद वसाहत पाटीलपाडा येथील सुनिल राज्या वळवी (२५) हा एमएच ३९ एल ९३३४ या दुचाकीने धडगावकडे परत येत होता़ दरम्यान धावलघाटात नाल्याजवळ समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या विनाक्रमांक दुचाकीने त्याच्या दुचाकीला धडक दिली़ या धडकेत सुनील वळवी हा गंभीर जखमी झाला होता़ त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी धुळे येथे दाखल केले होते़ याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़
याप्रकरणी रोहिदास राज्या वळवी यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयत सुनील वळवी याच्या दुचाकीला धडक देणाºया दुचाकीचा चालक अजय भोखा वळवी रा़ घाटली ता़ धडगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस कॉन्स्टेबल पवार करत आहेत़

Web Title: Youth dies in two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.