विजेचा शॉक लागून नवापुरात युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:57 IST2020-11-06T12:57:41+5:302020-11-06T12:57:53+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील इंदिरानगर परिसरात २५ वर्षीय युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ...

विजेचा शॉक लागून नवापुरात युवकाचा मृत्यू
n लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील इंदिरानगर परिसरात २५ वर्षीय युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
इंदिरानगरातील सप्तशृंगी माता मंदिरासमोरील विजय पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी त्यांचा मुलगा भावेश विजय पाटील (२५) हा बांधकामावर पाणी मारत असताना अचानक विजेचा शॉक लागला. त्यावेळेस त्याच्या बहिणीने प्लास्टिकची खुर्ची मारून त्याला वाचवण्याचा केला. परंतु त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. भावेश पाटील याने नुकताच नीटची परिक्षा दिली होती. त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. परंतु काळाने घाला घालत त्यांचे व आई-वडीलांचे स्वप्न अपूर्ण राहिले. भावेश हा विजय पाटील यांच्या कुटुंबातील एकुुलता मुलगा होता. त्यांच्या मोठ्या बहिणीचे १९ नोव्हेंबरला लग्न ठरले होते. मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेबाबत शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच नवापूर शहरातील नागरिकांनी इंदिरानगर व नवापूर शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये विचारपूस करण्यास धाव घेतली. तोपर्यंत डॉक्टरांनी भावेश पाटील यांना मृत घोषित केले. वडील विजय पाटील व त्यांच्या नातलगांनी यांनी रूग्णालयात केलेला आक्रोश ह्रदय पिळवटणारा होता.